टाळ-मृदुंगाच्या गजरात मुजावर पिरजादेवस्ती मांजरी शाळेच्या विद्यार्थ्यांची दिंडी

सांगोला :-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुजावर पिरजादेवस्ती मांजरी येथे आज दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी शाळेतील सर्व चिमुकले वारकरी वेशात टाळ, झेंडा घेऊन नाम लावून सहभागी झाले.
वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात शाळेत दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. हि दिंडी शाळेपासून निघून वस्तीवरून प्रसिद्ध देवस्थान पिरसाहेब दर्गा येथे पोहचली. तेथे पालकांनी दिंडीचे स्वागत केले, मुलांना खाऊ वाटला. मुलांनी डान्स, फुगडी, अल्पहोपहार याचा आनंद घेतला.
याप्रसंगी मांजरी केंद्राचे केंद्रप्रमुख मच्छिन्द्र जगताप,पालक रहिमान सय्यद, अमीर पटेल, प्रशांत सूर्यवंशी, सद्दाम मुजावर, फिरोज मुजावर, शाकिरा मुजावर, जैबून मुजावर तसेच वस्तीवरील महिला वर्ग, शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.