वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश

सांगोला (प्रतिनिधी)-दिनांक 30 जून 2024 रोजी विद्यामंदिर इंग्लिश मीडियम येथे शाओलीयन वर्ल्ड मार्शल आर्ट शाखा सांगोला यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या कलर बेल्ट व ब्लॅक बेल्ट या परीक्षेमध्ये एकूण सहा मुलांनी ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश संपादन केले. योगिनी रणदिवे, रिया बंडगर, असद खतीब, धीरज पांढरे , सुरज पांढरे, श्रीतेज लांबतुरे यांनी यश संपादन केले.
या परीक्षेमध्ये नवीन प्रकाराच्या टेक्निक्स, कता, किक फाइट, कुमिते, स्टमक, फिटनेस, विविध व्यायाम प्रकार, शालेय क्रीडा प्रकाराच्या कराटे खेळा च्या नवीन नियमावली, आंतरराष्ट्रीय कराटे खेळातील नियम व इतर प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय किर्तीचे जीके वाघमारे सर व निजेन्द्र चौधरी यांनी दिले.
यशस्वी विद्यार्थ्यांना श्री सुनील वाघमारे सर व श्रावणी वाघमारे मॅडम, राधिका गारळे, आशिष कोकरे, मयंक स्वामी धनश्री येडगे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंना डॉ.शैलेश डोंबे, अहिर सय्यद, प्रताप इंगोले, राजूभाई मगर, बाळासाहेब केदार आदींनी व विविध क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात आल्या.