फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये दुसरी राज्यस्तरीय रिव्ह्यू आर्टिकल रायटिंग स्पर्धा संपन्न

सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये दुसरी राज्यस्तरीय रिव्ह्यू आर्टिकल रायटिंग स्पर्धा इंटरनॅशनल जनरल ऑफ फार्मसी अँड हर्बल टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३/0३/२०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा विषय करंट सीनारियो ऑफ फार्मासुटिकल हर्बल मेडिसिन अँड फ्युचर प्रोस्पेक्ट असा होता. विद्यार्थ्यांमध्ये रिसर्च पेपर व रिव्ह्यू पेपर प्रकाशित करण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून 70 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे चेअरमन मा भाऊसाहेब रुपनर मॅनेजमेंट डायरेक्टर डॉ अमित रुपनर कार्यकारी संचालक मा दिनेश रुपनर व परिसर संचालक डॉ संजय आदाटे व फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरित्या पार पडला. या स्पर्धेत कु. ऋषिकेश चौधरी डॉ डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डी पुणे याला प्रथम क्रमांक कु. ऋतुराज पवार अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी पेठ वडगाव द्वितीय क्रमांक कु. वैभवी चासकर सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नंदगाव पुणे यांनी पटकावला दोन उत्तेजनार्थ क्रमांक कु. सोवा सासमल फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी सांगोला व कु श्रीतेज वराडी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे यांनी पटकावला.
विजेत्यांना प्रथम क्रमांक ५०००/- द्वितीय क्रमांक ३०००/- तृतीय क्रमांक २०००/- व दोन उत्तेजनार्थ ५०१/- बक्षीसे व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू आर्टिकल इंटरनॅशनल जनरल ऑफ फार्मसी अँड हर्बल टेक्नॉलॉजी या जनरल मध्ये प्रकाशित केले जाणार आहेत या स्पर्धेचे संयोजक म्हणून प्रा अमोल विलास पोरे तर समन्वयक म्हणून प्रा डॉ. सर्फराज काजी, डॉ. योगेश राऊत, डॉ. सविता सोनवणे व प्रा शिरीष नागणसूरकर यांनी काम पाहिले ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.