सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

*डॉ बाबासाहेब देशमुख‌ यांनी डॉ अनिकेत देशमुख यांच्या उमेदवारीसाठी शरदचंद्र पवार साहेबांकडे धरला आग्रह

गुरुवार दि ४ एप्रिल रोजी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी देशाचे नेते मा.शरचंद्र पवारसाहेब यांची सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली.. भेटीदरम्यान माढा लोकसभेसाठी शेतकरी कामगार पक्षाचे मा.डाॅ.अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली..

माढा लोकसभा मतदार संघ हा परंपरागत पुरोगामी विचारसरणीचा मतदार संघ असुन या मतदार संघातील जनता ही पुरोगामी विचारधारा जोपासणारी असुन जर शेतकरी कामगार पक्षाला माढा लोकसभा मतदारसंघातुन उमेवारी आघाडीच्या माध्यमातून दिली तर विजय निश्चित होईल असा विश्वास डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी पवार साहेबांना दिला.या आगोदर रायगड, उस्मानाबाद या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे खासदार होते त्यांचे कार्य सुध्दा लोकाभिमुख होते ..

 

शेतकरी कामगार पक्ष हा‌ शेतकरी , कष्टकरी,कामगार यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा पक्ष म्हणून आजही जनता शेकापक्षाकडे पहात आहे..या लोकसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाची दिड लाख मते आहेत..त्याच बरोबर आघाडीतील प्रमुख पक्षांचा ही प्रभाव या माढा मतदारसंघावरती असुन जर डॉ अनिकेत देशमुख यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दिली तर नक्कीच विजय होईल.माढा मतदार संघातील समाविष्ट तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती व जनतेच्या मनातील सरकार विरोधी खदखद पहाता माढा मतदार संघ हा नक्कीच आघाडीकडे पुंन्हा येईल आशी खात्री डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी दिली.

सदर भेटी प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी गायकवाड हे ही उपस्थित असल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!