सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय व इंग्लिश मेडिअम स्कूल च्या विद्यार्थ्यांची बालदिंडी संपन्न.

सांगोला ( प्रतिनिधी):- बा विठ्ठला ! नाम तुझे घेता देवा होई समाधान, ज्ञानबा तुकाराम, विठ्ठल नामाचा गजर करीत सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक, प्राथमिक व सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांची बालदिंडी आज होणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने काल उत्साही आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत एकनाथ, संत नामदेव आणि इतर संताच्या नामाने सांगोला शहर दुमदुमले.
तत्पूर्वी आषाढी पालखी दिंडी सोहळ्याच्या पालखीचे पूजन इंग्लिश मेडिअम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे, प्राथमिक विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक उदय बोत्रे, पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर, यांच्या हस्ते करण्यात आले. सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक मधील छोटा शिशू ते इयत्ता पहिली आणि इंग्लिश मेडिअम स्कूलच्या नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यानी आणि शिक्षकांनी रिंगण आणि फुगडी खेळाचा आनंद लुटत आषाढी पालखी दिंडी सोहळ्यात हरिनामाचा गजर केला.
सदर पालखी दिंडी सोहळा सांगोला शहरातील तहसिल कार्यालय कचेरी रोड, जयभवानी चौक, मेन रोड, मणेरी गल्ली, शनी गल्ली, महादेव गल्ली, झपके वाडा,देशपांडे गल्ली,कोष्टी गल्लीतील चौंडेश्वरी मंदिर, खडतरे गल्ली, वाढेगाव नाका, आंबेडकर पुतळ्यासमोरून सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल व प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात पालखी सोहळा विसावला.

सदर पायी पालखी सोहळ्यात सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्ती वर बहारदार नृत्य सादर केली. महादेव गल्ली झपके वाडा येथे संस्था कार्यकारिणी सदस्या सौ. शीलाकाकी झपके, माजी नगरसेविका वैशाली झपके, यांच्या हस्ते आषाढी दिंडी पालखीचे पूजन करण्यात आले. सदर पायी पालखी सोहळ्यात दोन्ही माध्यमातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर आषाढी पालखी दिंडी सोहळ्याचे सूत्रसंचलन संगमेश्वर घोंगडे सर, जगन्नाथ साठे सर यांनी केले तर आभार शशिल ढोले पाटील सर यांनी मानले. सदर पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी दोन्ही माध्यमाचे मुख्याध्यापक, उत्सव विभाग प्रमुख अनुपमा गुळमिरे, विद्याराणी भुसे, मनिषा बुंजकर सर्व शिक्षक शिक्षिका, आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.