जि.प.प्रा.मुलींची शाळा जवळे येथील विद्यार्थिनी बनल्या वारकरी.

जवळे(प्रशांत चव्हाण) बुध.दि. 28 जून रोजी जवळे येथील जि. प. प्रा.मुलींची शाळा जवळे मधील विद्यार्थिनींची आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये अंगणवाडी क्र.1 मधील लहान मुलेही सहभागी झाली होती. दिंडीमध्ये सहभागी विद्यार्थिनींनी विठ्ठल, रुक्मिणी, राधाकृष्ण मीरा, ज्ञानेश्वर इत्यादी वेशभूषा साकार केल्या होत्या. चिमुकल्यांची ही दिंडी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसह तुकाराम महाराज व माऊलींचा जयघोष करत गावातील मुख्य बाजारपेठेतून स्टँडवरील चौकात आली. चौकात गोल रिंगण करून सर्वांनी फुगड्या खेळल्या थोडा विसावा घेऊन ही दिंडी मारुती मंदिराजवळ आली. तेथील मैदानावर दुसरे गोल रिंगण पार पडले. यानंतर दिंडी शाळेत पोहोचली व गावकऱ्यांनी दिलेल्या विविध प्रकारच्या खाऊचे वाटप होऊन दिंडीची सांगता झाली.

बालदिंडीचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. विकास साळुंखे, सहशिक्षिका श्रीमती रतन कोळेकर, श्रीमती सुवर्णा शेडसाळे यांनी दिंडीचे योग्य नियोजन केले. तसेच अंगणवाडी सेविका सौ. विद्या कंगोरे मदतनीस सौ. सविता आमले यांचेही सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button