जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथे रंगला बालगोपाळांचा रिंगण सोहळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा दिंडी व रिंगण सोहळा पार पडला.यावेळी दिंडी सोहळ्यातील विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.संदिप खुळपे यांनी केले तर विठ्ठल रुक्मिणी बनलेल्या विद्यार्थ्यांचे पुजन शिवसेना युवा नेते श्री साहेबराव शिंदे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ.संगिता ढोबळे मॅडम यांनी केले.शाळेच्या मैदानावर रिंगण सोहळा पार पडला
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर पवार सर, श्री सागर गुरव सर,आदर्श शिक्षिका योगिता शांत मॅडम यांनी विठ्ठलाचे अभंग गायले, विठ्ठलनामाचा गजर केला शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी,पालक सहभागी झाले होते.संपूर्ण गावातून भजन करत ज्ञानेश्वर माऊली मंदिर, सिध्दनाथ मंदिर येथे दर्शन घेऊन दिंडी सोहळा पार पडला.नागरिकानी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले .सर्व विद्यार्थ्यांना मा.श्री साहेबराव शिंदे यांनी केळी वाटप केली व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.श्री संदिप खुळपे यांनी बिस्किट पुडे वाटप केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विजयकुमार शिंदे सर, श्री माणिक मिसाळ सर ,श्रीमती स्वाती पाटील मॅडम, श्रीमती सोनल सावंत मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सर्वांचेआभार शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर पवार सर यांनी मानले.



