*लायन्स झोन चेअरमनपदी प्रा.धनाजी चव्हाण यांची निवड*

सांगोला ( प्रतिनिधी ) द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज प्रांत ३२३४ ड १ रिजन १ झोन ५ झोन चेअरमनपदी सांगोला लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण यांची प्रांतपाल ला.भोजराज नाईक- निंबाळकर यांन निवड केली आहे.
जगातील १६६ हून अधिक स्वतंत्र देशात २८५०० पेक्षा जास्त शाखा असणाऱ्या लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या कार्यात सुसूत्रता यावी यासाठी प्रांतरचना केली आहे.त्यानूसार प्रांत ३२३४ड१ मध्ये सांगली, सातारा, सोलापूर ,कोल्हापूर रत्नागिरी व पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुक्याचा समावेश आहे. लायन वर्ष २०२३-२४ साठी प्रांताची ५ रिजन व २३ झोन मध्ये विभागणी आहे.
माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांचे मार्गदर्शनाखाली ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी सन २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्षपदी कार्य करताना सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने सामाजाच्या अभ्युदयासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून क्लबचा नावलौकिक वाढविला आहे.यापुढे प्रांत स्तरावरील त्यांच्या झोन चेअरमनपदी निवडीबद्दल लायन्स क्लब ऑफ सांगोला सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी प्रा.चव्हाण यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .
ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके (प्रांतपाल २००९-१०) यांचे मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ सांगोलाकडून आजवर खूप मौलिक कार्य झाले आहे.लायन वर्ष २०२१-२२ व २२-२३ मधील एक सदस्य एक झाड, आयडॉल्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे , जागतिक दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान,अन्नदान सप्ताह व कायमच्या उपक्रमातून समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करता आले याचा मनस्वी आनंद आहे.यापुढेही झोन चेअरमनपदी कार्य करताना प्रत्येक क्लब अधिक उन्नत, अधिक परिपूर्ण, अधिक समृद्ध करण्यासाठी कार्य करण्याचा मानस आहे.
ला.प्रा.धनाजी चव्हाण, नूतन झोन चेअरमन