सांगोला विद्यामंदिरमध्ये राष्ट्रीय खो- खो दिन उत्साहात साजरा

सांगोला (प्रतिनिधी) ३० जून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खो -खो दिनानिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे मध्ये प्रसिद्ध उद्योगपती मा. प्रमोद म्हमाणे यांच्या शुभहस्ते खो- खो मैदानाचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके , सचिव म.शं घोंगडे ,प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शाहिदा सय्यद,पर्यवेक्षक पोपट केदार, प्रा. डी के पाटील (सोलापूर जिल्हा खो खो ॲम्युचर असोसिएशन सोलापूर कार्यकारणी सदस्य),सर्व क्रीडा शिक्षक,सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.