जि प शाळा मेडशिंगी येथे आषाढी दिंडी संपन्न

जि प शाळा मेडशिंगी येथे आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांच्या बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले या बाल दिंडीच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या वेशभूषेत आले होते.
दिंडीच्या सुरुवातीला पालखीचे पूजन माता पालक गटाच्या मंजुषा कांबळे, सौ.अर्चना टिळे सौ अमृता सरगर वृषाली राऊत सौ.ज्योती राऊत, सौ.रोहिणी वाघमोडे यांचे हस्ते करण्यात आले.त्यानंतर सदर दिंडी गावातून विठू नामाच्या जयघोषात हनुमान मंदिर येथे पोहोचले तेथे उपस्थित पालक यांनी रिंगण फुगडी इत्यादी खेळांचा आनंद घेतला.
यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते त्यानंतर तेथेच सर्व बाल वारकरी यांना शाळेच्या वतीने केळी व सौ.मंजुषा कांबळे यांचे वतीने राजगिरा लाडू यांचे वाटप करण्यात आले दिंडी गावातून जात असताना ज्योती राऊत यांचे घरी पालखीचे पूजन करण्यात आले त्यानंतर दिंडी भजन आणि कीर्तन करीत पुन्हा शाळेच्या आवारात आली.
सदर दिंडी यशस्वी होण्यासाठी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.राजेश गडहिरे यांनी परिश्रम केले तसेच श्री.चंद्रकांत बाबर सर व महादेव कमळे गुरुजी यांनी दिंडीचे सुयोग्य नियोजन केले सदर दिंडीसाठी गावातील बहुसंख्य पालक उपस्थित होते अंगणवाडी सेविका सौ.सुनीता कांबळे, मदतनीस सौ.चांदणी कसबे यांनी सर्वतोपरी सहकार्य केले