सांगोला तालुका

स्व.आबासाहेबांचे अपुर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणार-डॉ.भाई बाबासाहेब देशमुख; मंगळवेढा येथे 31 वी पाणी परिषद संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- येणार्‍या काळात पाणी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून आम्ही शेवटच्या  शेतकर्‍यांच्या शेतात पाणी पाहिल्या शिवाय व ते  पाणी समनिहाय पाणी वाटप कायद्याप्रमाणे मिळाल्या शिवाय ही चळवळ थांबवणार नाही. स्व.आबासाहेबांनी व नागन्नाथअण्णांनी दुष्काळी भागाचे नंदनवन करण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होईपर्यंत आपण लढत राहणार असून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले.

मंगळवेढा येथे तेरा दुष्काळी तालुक्यातील जनतेची पाणी परिषद संपन्न मा.प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी वैभवकाका नायकवडी, बाबुराव गुरव, अँड बी.बी.जाधव, सुनिल पोतदार, भाई चंद्रकांत(दादा) देशमुख, प्रा.चंद्रकांत गायकवाड, राजलक्ष्मी गायकवाड, प्रा.दत्ताजीराव गायकवाड, प्रा.आर एस चोपडे व बाळासाहेब नाईकवाडी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सर्व मांन्यवरांनी आपापले विचार व्यक्त करताना दुष्काळी जनतेला पाणी मिळवुन देण्यासाठी पाणी संघर्ष चळवळ मजबुत करण्याबाबतचे विचार व्यक्त केले.

पुढे बोलताना डॉ.भाई बाबासाहेब देशमुख म्हणाले की, स्व.गणपतरावजी देशमुख व नागन्नाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली गेले कित्येक वर्षे ही पाणी परिषद आयोजित करण्यात येत आहे.तेरा दुष्काळी तालुक्यातील शेतकर्‍यांना एकत्रित करून पाणी संघर्ष उभा केला तो संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे.या पाणी संघर्ष चळवळीच्या माध्यमातून विविध आंदोलने केली आहेत.पाणी संघर्ष समितीच्या आंदोलनामुळे आज टेंभु-म्हैसाळ योजनेद्वारे दुष्काळी तालुक्यातील शेतकर्‍यांना पाणी मिळत आहे तरीही हे पाणी म्हणावे तसे व पाहिजे त्या प्रमाणात येत नाही. यामध्ये सातत्य राहण्यासाठी आपले आंदोलनाला  आणखी धार द्यावी लागेल. आजमितीला माणनदीकाठचे बंधारे कोरडे पडले आहेत..साठवण क्षमता काही प्रमाणात उपलब्ध असताना ते बंधारे भरुन घेतले तर शेतकर्‍यांना याचा नक्कीच फायदा होईल.यासाठी कायद्यांमध्ये तशी तरतुद करुन नदीकाठचे बंधारे भरण्याची तरतुद कायमस्वरूपी करावी त्यासाठी लागणार्‍या पाण्याची तरतुद करावी.अशी मागणी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!