वझरे विकास सोसायटीच्या चेअरमन पदी दत्तात्रय सरगर यांची निवड

वझरे ता सांगोला विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन परिषद शेकाप शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस आय आघाडीचे दत्तात्रय सुखदेव सरगर यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडीनंतर चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही एच घोडके अमर गोसावी व मच्छिंद्र सरगर यांनी काम पाहिले.
या अगोदरचे चेअरमन संजय बाबुराव पाटील यांनी राजीनामा दिल्याने दत्तात्रय सुखदेव सरगर यांची निवड करण्यात आली. यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र पालसांडे ,संचालक बसवेश्वर पाटील ,वसंत पाटील, सदा वाघमोडे ,पोपट गुरव, पांडुरंग चव्हाण, अमोल बापू वाघमारे ,संचालिका सखुबाई वाघमोडे, मंदाकिनी रेड्डी ,लक्ष्मी कदम ,सुमन रेड्डी ,सचिव मच्छिंद्र सरगर तसेच माजी प्राचार्य के वाय पाटील शिक्षक नेते दत्तात्रय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तरी यावेळी माजी सरपंच लिंगाप्पा पाटील ,राजू पाटील ,अंकुश पाटील, तमन्ना पाटील, महादेव पाटील, पांडुरंग कोकरे ,रामचंद्र कोकरे, बाबासो सरगर, विजय कोटी ,स्वप्निल रेड्डी ,धर्मा वाकडे ,दत्ता वाकडे ,अशोक खांडेकर ,प्रशांत रेडी ,सुरेश पाटील ,भारत रेडी मल्हारी चव्हाण ,प्रशांत कदम ,सिद्धेश्वर कोकरे सचिन कोकरे, रावसाहेब कोकरे ,किसन कोकरे सुभाष कोकरे सुहास कोकरे सुरेश कोकरे आबा कोकरे नामदेव सरगर चंद्रकांत साळुंखे लक्ष्मण आलदर अनिल कोकरे बंडू कोकरे शंकर साळुंखे दत्ता आलदर व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक नेते उत्तम सरगर सर यांनी तर आभार गंगाधर जुंदळे यांनी मानले.