चोपडी विविध कार्यकारी सोसायटीची 100% वसुली; चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचे परिसरातून कौतुक*

नाझरा(वार्ताहर):- चोपडी विकास सेवा सोसायटीची कर्ज वसुली सन 2022-23 च्या वर्षात शंभर टक्के झाली आहे. त्याबद्दल परिसरातील ग्रामस्थांकडून चोपडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भिकाजी नारायण बाबर, व्हाईस चेअरमन मल्हारी मेकले, सचिव सुनील बाबर यांच्यासह सर्व संचालक मंडळांचे परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
विविध कार्यकारी सेवा सोसायटीने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सन 2022-23 या वर्षासाठी एक कोटी 96 लाख 27 हजार 995 रुपये कर्ज घेतले होते.त्या कर्जाची पूर्णपणे परतफेड बँकेला केली असून संस्थेने बँकेची कर्ज परतफेड शंभर टक्के केली असून सभासद पातळीवर 90% कर्ज वसुली झाली आहे.सदरची कर्जवसुली करण्यासाठी चोपडी गावचे विद्यमान सरपंच मंगल सरगर,उपसरपंच युवा नेते पोपट यादव, दगडू बाबर, संचालक पितांबर खळगे,ज्ञानेश्वर जरग, किसन बाबर,जालिंदर बाबर, ज्ञानेश्वर बाबर, विशंभर बाबर,वैशाली बाबर,सखुबाई बाबर,संदिपान लाडे, हनुमंत खांडेकर,रामचंद्र केंगार या सर्व संचालक मंडळांनी कर्ज वसुली करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सध्या चोपडी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकान सुरू आहे,
परिसरातील नागरिकांना याचा व्यवस्थितपणे लाभ मिळत आहे, त्याचबरोबर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजनाही विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने राबवली जाते. विविध उपक्रमातून ही सेवा सोसायटी नागरिकांच्या हिताचे काम करत असल्याने परिसरातील नागरिकांकडून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.