सांगोला विद्यामंदिरमध्ये इयत्ता ११ वी नवगतांचे उत्साहात स्वागत

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यू .कॉलेज सांगोला येथे शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ प्रवेश प्रक्रियेनुसार दि.३ जुलै २०२३ रोजी इयत्ता अकरावी कला, वाणिज्य व शास्त्र शाखेचे वर्गाची सुरूवात झाली.
यानुसार पहिल्या दिवशी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सदर स्वागत समारंभ प्राचार्य गंगाधर घोंगडे , उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभिषण माने, पोपट केदार , शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब पुष्प देऊन संपन्न झाला.
यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.