सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न*

महाभारताचे लेखक आणि वेद संकलित करणारे ऋषी वेद व्यास यांचा जन्मदिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला. या नंतर इ.९वीतील कु.प्रिया इंगोले,वैष्णवी खंदारे यांनी आपल्या मनोगतामध्ये गुरूंचे महत्त्व सांगितले तसेच इ.७वीतील कु. सोनल जगधने हिने गुरूंविषयी एक कविता सादर केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन शिक्षकांचे आशीर्वाद घेतले व कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.सरिता कापसे, पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इ.९वी तील कु.अवधूत डबीर याने केले तर कु. सायली गडदे हिने शेवटी सर्वांचे आभार मानले.