इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांचा डिस्ट्रिक्ट 313 असेंबली मध्ये गौरव

इनरव्हील डिस्ट्रिक्ट 313 ची असेम्ब्ली संगमनेर येथे नुकतीच थाटामाटात संपन्न झाली. दरवर्षीप्रमाणे इनरव्हील क्लब ऑफ सांगोला हे नाव डिस्ट्रिक्ट 313 मध्ये झळकले आहे.
संगमनेर येथे झालेल्या असेम्ब्ली मध्ये इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे .यामध्ये बेस्ट एन्व्हायरमेंट प्रोजेक्ट साठी प्रथम क्रमांक व ट्रॉफी, सिनर्जी प्रोजेक्टसाठी तृतीय क्रमांक, एनी आदर प्रोजेक्टसाठी तृतीय क्रमांक त्याचबरोबर बेस्ट एडिटर क्लब ची एडिटर प्रज्ञा चौगुले यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
हा सन्मान माझ्या एकटीचा नसून इनरव्हील क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचा आहे असे अध्यक्षा उमा उंटवाले यांनी सांगितले. क्लबच्या टीम वर्कमुळेच आपण कोणतेही काम यशस्वीरित्या पार पाडू शकतो, व आम्ही ग्रामीण भागातील महिलाही कशातही कमी पडणार नाही हे दाखवून दिले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षा सौ उमा उंटवाले ,सचिव सौ स्वाती अंकलगी ,नूतन अध्यक्षा सौ सविता लाटणे, पास्ट प्रेसिडेंट सौ रत्नप्रभा माळी व सौ सुवर्णा इंगवले, तसेच सौ कविता दिवटे ,सौ वंदना महिमकर इत्यादी सदस्या उपस्थित होत्या.
One attachment • Scanned by Gmail