प्राची घोंगडे हिचे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तुंग यश; सांगोल्यातील दुसरी लिंगायत महिला सीए होण्याचा मान प्राची ने मिळविला

सांगोला शहरातील उद्योजक अनिल मोहन घोंगडे यांची कन्या कु.प्राची हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (CA) या संस्थेमार्फत मे २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (CA) च्या परीक्षेत दैदीप्यमान यश मिळवत सांगोला शहरातून दुसरी लिंगायत महिला सीए होण्याचा सन्मान प्राप्त केला. यापूर्वी कु.दिवीजा प्रशुद्धचंद्र झपके यांनी सुद्धा सीएची पदवी प्राप्त केली आहे.
जिद्द व चिकाटी च्या जोरावर प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते असे सांगणारी कुमारी प्राची घोंगडे हिचे प्राथमिक शिक्षण उत्कर्ष प्राथमिक विद्यालय, माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर प्रशाला, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे येथे झाले असून तिने पुढे एम.कॉम.ची पदवी देखील घेतली आहे.
कुमारी प्राचीच्या या यशात तिला आत्तापर्यंत मार्गदर्शक ठरलेले सर्व गुरुजन यांच्यासह वडील श्री.अनिल व आई सौ.प्रज्ञा यांचे अनमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाल्याचे तिने सांगितले.महिलांमधून यशस्वी होण्याचे अल्पप्रमाण असणाऱ्या या परीक्षेत तिने यश प्राप्त केले असल्याने लिंगायत समाज तसेच सांगोला शहरातून तिचे कौतुक होत आहे.