वाटंबरेचे सुरेश पवार यांना कृषी प्रेरणा पुरस्कार

नाझरा(वार्ताहर): -नाशिक येथील ऍग्रो केअर कृषी मंचच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक आदर्श कृषी प्रेरणा पुरस्कार वाटंबरे येथील कृषी उद्योजक यशराज गांडूळ खत प्रकल्प वाटंबरेचे सुरेश पवार यांना सिने अभिनेते दीपक शिर्के कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कृषी दिनानिमित्त पंचवटी नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आदेश थाथा डॉक्टर प्रमोद रसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे सुरेश पवार यांनी गांडूळ खताचे सुरू केले अतिशय उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश शेतकऱ्यांना उपलब्ध करून त्यांनी अल्पावधीतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. यशराज गांडूळ खतास अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी पहिली पसंती दिली आहे. पाच बेड पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज शंभर बेड च्या पुढे गेला आहे. कॉलिटीच्या गांडूळ खतासाठी त्यांचे ओळख आणि ब्रँड झाला आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.