सांगोला विद्यामंदिर प्रशालेत एन एम एम एस परीक्षा पालक शिक्षक सभा संपन्न

सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये एन एम एम एस परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा संपन्न झाली. या सभेत बोलताना आपण काहीही करू शकतो ही मानसिकता विद्यार्थ्यास यशापर्यंत पोहोचवते असे प्राचार्य गं.ना.घोंगडे यांनी असे मत व्यक्त केले.शिक्षक-पालक सभेच्या सुरुवातीस पर्यवेक्षक श्री अजय बारबोले यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
परीक्षा संदर्भात सर्व माहिती श्री. अमोल महिमकर सर यांनी सांगितली.एन एम एम एस व सारथी शिष्यवृत्ती आवश्यक कागदपत्रे याबद्दलची माहिती व अभ्यास कसा करावा यासंदर्भात विभाग प्रमुख प्रदिप धुकटे सर यांनी मार्गदर्शन केले. श्री नरेंद्र होनराव सर ,श्री राजेंद्र ढोले सर, कुमारी भाग्यश्री मिरजे मॅडम यांनी आपापल्या विषयाबद्दल मार्गदर्शन केले. पालकांच्या मनोगतामध्ये अनेक पालकांनी संस्था व शाळा राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल सर्वांचे कौतुक केले, तसेच काही पालकांनी काही मार्गदर्शनपर सूचना केल्या.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक श्री. लक्ष्मण विधाते ,पर्यवेक्षक श्री.अजय बारबोले तसेच सर्व पालक मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच संस्था बाह्य परीक्षा प्रमुख श्री.नामदेव खंडागळे व प्रशाला बाह्य परीक्षा प्रमुख श्री वैभव कोठावळे उपस्थित होते.या पालक सभेचे सूत्रसंचालन श्री. नरेंद्र होनराव सर यांनी केले तर आभार श्री.निलेश जंगम सर यांनी मानले.