डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील अर्थशास्त्राचा विद्यार्थी प्रा. पवनकुमार भोसले सेट परीक्षा उतीर्ण

सांगोला:- प्रा. पवनकुमार बाजीराव भोसले मु. पो. चांडोलेवाडी ता. सांगोला यांनी नुकतीच झालेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणारी सेट परिक्षा अर्थशास्त्र या विषयातून उत्तीर्ण केली.
प्रा. पवनकुमार भोसले हे सध्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत अर्थशास्त्र या विषयात प्राचार्य डॉ. आर. पी. ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हातील लघुउद्योगांच्या विकासामधील मुद्रा योजनेच्या योगदानांचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर संशोधन कार्य करीत आहेत, तसेच या संशोधनासाठी त्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संख्या (सारथी) पुणे यांच्या वतीने संशोधन अधिछात्रवृती (फोलोशिप) मिळत आहे
– प्रा. भोसले यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्रा शाळा चांडालेवाडी व माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेज सांगोला व पदवी शिक्षण डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला. तसेच पदव्युत्तर शिक्षण के. बी. पी. महाविद्यालय, पंढरपूर येथून झाले. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालया मधील अर्थशास्त्र विषयांचे प्रमुख व मार्गदर्शक प्रा. संभाजीराव शिंदे, प्राचार्य डॉ. सिंकदर मुलाणी, प्रा संतोष भोसले, डॉ. रूपनर सर, प्रा. धसाडे सर, डॉ. सूर्यवंशी, प्रा. पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे व त्यांना पुढील कार्यास डॉ बाबासाहेब देशमुख, प्रा. साजिद तांबोळी, अशोक इंगोले सर, उमेश चांडोले, संतोष शेंबडे, अमोल पाटील सर, नवनाथ नवले, अमोल नवले, विजयकुमार खोकले, बबलू भोसले, ज्योतिबा धोकटे, शहाजी सावंत यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.