सांगोला तालुका

सांगोला रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

सांगोला:- सांगोला रोटरी क्लबने सांगोला तालुका परिसरात खूप चांगले काम केले आहे. रोटरी क्लब एक समाजसेवेचे मंदिर आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने सुरू असलेले कार्य एखाद्या देवदूताप्रमाणे आहे. या कार्यात भर घालण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा असे आवाहन रो.डॉ.उल्हास कोल्हटकर यांनी केले.

सांगोला रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ मंगळवार दिनांक 11 जुलै रोजी सिंहगड कॅम्पस कमलापूर येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.व्यासपीठावर मा.प्रांतपाल रो.डॉ.उल्हास कोल्हटकर, सहा.प्रांतपाल रो. जितेंद्र जाजु, मावळते अध्यक्ष रो. दत्तात्रय पांचाळ सर, मावळते सचिव रो.इंजि.विकास देशपांडे, नूतन अध्यक्ष रो.डॉ.साजिकराव पाटील, नूतन सचिव अ‍ॅड.रो.सचिन पाटकुलकर उपस्थित होते.यावेळी मा.प्रांतपाल रो.डॉ. उल्हास कोल्हटकर बोलत होते.

प्रारंभी मावळते अध्यक्ष रो. दत्तात्रय पांचाळ सर यांचेकडून नूतन अध्यक्ष रो.डॉ.साजिकराव पाटील यांनी अध्यक्षपदाचा तर मावळते सचिव रो.इंजि.विकास देशपांडे यांचेकडून नूतन सचिव रो.अ‍ॅड.सचिन पाटकुलकर यांनी पदभार स्विकारला. मावळते सचिव रो.इंजि.विकास देशपांडे यांनी गेल्या वर्षभरातील क्लबच्या कार्याची माहिती दिली.

यावेळी मावळते अध्यक्ष रो. दत्तात्रय पांचाळ सर आपल्या मनोगतात म्हणाले की, गेल्या वर्षभरात कमी प्रोजेक्ट झाले असतील पण जे उपक्रम राबविले ते उपक्रम हितकारक व गरजू होते यांचा मनस्वी आनंद आहे.गेल्या वर्ष भरात अनेक समजोपयोगी कामे करणार होतो पण वेळेअभावी ते उपक्रम घेता आले नाहीत. ती सर्व राहिलेले कामे नूतन पदाधिकारी करतील.असा विश्वास व्यक्त करत नवीन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.मागील काळात सर्वांनी जे सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
नूतन अध्यक्ष रो.प्रा.सजिकराव पाटील म्हणाले, रोटरी समाजासाठी काम करत असते. सामाजिक कार्यासाठी रोटरी सारखा प्लॅट फॉर्म नाही. सामाजिक कामाची अगोदर पासून आवड असून यापुढील अध्यक्षपदाच्या कालावधीत रोटरीमार्फत गरजूंना मदतीचा हात देणार आहे. सांगोल्याने आजपर्यंत जे प्रेम मला दिले त्याचे प्रतीक रोटरी क्लबचे अध्यक्षपद असल्याचे सांगत मनाने खचलेली आज समाजात जास्त माणसे आहेत. त्यांच्यामध्ये आशा निर्माण करण्याचे काम या वर्षी रोटरी क्लबकडून करणार आहोत. आगामी वर्षभरात राबविण्यात येणारे उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करत सर्वांना विश्वासात घेवून अध्यक्षपदाचा कारभार करु असा विश्वास सर्वांना दिला.
यावेळी बेस्ट रोटरियन म्हणून रो.डॉ. मच्छिंद्र सोनलकर, रो.इंजि.विलास बिले, रो.डॉ.प्रभाकर माळी, रो.डॉ.संतोष पिसे, रो.अरविंद डोंबे गुरुजी यांना उपस्थित पाहुण्याचा हस्ते सत्कार करण्यात आला.

संपादक रो.हमीद शेख, सहसंपादक रो. इंजि.विकास देशपांडे यांच्या ज्ञानसंस्कार या रोटरी बुलेटियनचां प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी वाढदिवसानिमित्त रो.अमर जाधव, नूतन सीए.समाधान शिंदे यांना सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कन्या असल्याबद्दल सौ व श्री.रो.डॉ.प्रभाकर माळी, सौ.व श्री. रो.अशोक नवले, सौ.व श्री.राजेश वालवढकर, डॉ.कैलाश कारंडे यांचा सत्कार करण्यात आला. मा.प्रांतपाल रो.डॉ.उल्हास कोल्हटकर यांची ओळख इंजि.हमीद शेख यांनी करुन दिली.

मा.प्रांतपाल रो.डॉ. उल्हास कोल्हटकर यांना रो.डॉ.इरफान तांबोळी यांच्या हस्ते तर सहा.प्रांतपाल रो. जितेंद्र जाजु यांना रो.श्रीपती आदलिंगे यांच्या हस्ते रोटरी क्लबकडून भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमास अकलूज, पंढरपूर, अक्कलकोट रोटरी क्लबचे सदस्य, पदाधिकारी, नागरिक, महिला, हितचिंतक, शहर व परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्यासह सांगोला रोटरी क्लबचे सर्व सदस्य, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन अ‍ॅड.गजानन भाकरे यांनी तर आभार रो.अ‍ॅड.सचिन पाटकुलकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!