शासनाने दुधाला ५ रुपये अनुदान द्यावे व जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न ताबडतोब सोडवावा-डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख

राज्यसरकारने एक लिटर दुधाला ५रुपये अनुदान जाहीर करावे..व जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न ताबडतोब सोडवावा यासाठी राज्य शासनाने त्वरीत निर्णय जाहीर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी मा.तहसिलदार साहेब सांगोला यांना करण्यात आली…
सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.काही भागात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडत आहे..तर सोलापूर जिल्ह्यासहित सांगोला तालुक्यात पाऊसाने धडी मारली आहे.गेल्या वर्षी अवकाळी मुळे नुकसान झाले तर या वेळेस पाऊसच नाही आशा वेळी शेतकऱ्यांच्या हातात कुठलेही पिके लागली नाहीत.आता तर काही सामाजीक संस्थानी पिण्याच्या पाण्यासाठी काही भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.त्याच बरोबर जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे..आशा वेळी राज्य सरकारने योग्य ती उपाययोजना आखुन जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा..अन्यथा शेतकरी पशुपालक आणखीन अडचणीत येईल.
शेती व्यवसाय अडचणीत असताना काही शेतऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपला मोर्चा दुध व्यवसायाकडे वळवला .व पशुपालक-शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व काहींनी कर्ज काढून गायींची खरेदी केली..व आपला प्रपंचा चालावा म्हणून दुध व्यवसाय सुरु कूला.. शेतकरी दुध व्यवसायाकडे वळाला आणी बाजारात गायींच्या किंमतीत आधारणता २०ते ३०हजारांनी वाढ झाली..तरीही शेतकऱ्यांनी हा व्यवसाय हिमतीने चालु ठेवला अशातच मायबाप सरकारने दुधाचे दर कमी करुन पशुपालक -शेतकऱ्यांना धक्का दिला..राज्यभर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.शेतकरी कामगार पक्षाने पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दुध दरवाढीबाबत रस्ता आंदोलन सुध्दा करण्यात आले.. राज्यभर आशी आंदोलने अनेक संघटनांनी केली त्याची परीणीती सरकारने दुध दरवाढ केल्याचे भासवले..व दोन रुपये दर वाढला व फॅटच्या नावाखाली तसेच वाहतुक व कमीशन या बाबतीत पैसे कमी केले परीणामी आणखी दुधाचे दर पहील्यापेक्षा कमीच झाले..ही जी दरवाढ केली ना ती फसवी दरवाढ आहे…व पशुपालक शेतकऱ्यांची फसगत करण्याचा प्रकार आहे.
यासाठी ठोस उपाययोजना म्हणून राज्य सरकारने दुधाच्या दराला ५रूपयांचे अनुदान द्यावे व जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ताबडतोब सोडवावा अशी मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मा.तहसिलदार सांगोला यांना देण्यात आल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली