सांगोला तालुकाक्राईम

सांगोला वनविभागाकडून अवैध वृक्षतोड, अवैध वाहतुक अवैध चराई करणार्‍यावर कारवाई; 5 लाखांचा दंड वसुल

सांगोला(प्रतिनिधी)::-सांगोला वनविभागाकडून अवैध वृक्षतोड, अवैध वाहतुक अवैध चराई करणार्‍यावर दंडात्मक कारवाई करून पाच लाख रुपयांचा शासकिय भरणा केला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी टी.व्ही.जाधव यांनी दिली.सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी उपवनसंरक्षक श्री धैर्यशील पाटील व सहा वनसंरक्षक श्री.बी. जी. हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईमध्ये अवैध वृक्षतोड, अवैध वाहतुक अवैध चराई इ. सांगोला तालुक्यात होत असल्याने दंडात्मक कारवाई करून पाच लाख रुपयांचा भरणा स्टेट बैंक ऑफ इंडिया सांगोला येथे केला आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोड करणारे व्यापारी, आरागिरणीधारक, अवैध चराई करणारे व्यक्ती यांचे धाबे दणाणले आहेत. वनविभाग सांगोला कार्यालयाकडून वृक्षतोड परवाना घेवून त्यानंतर वृक्षतोड करावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले.

तसेच बेवारस कोळसा पोती 300 जप्त केली आहेत. त्याचा लिलाव लवकरच होणार असून त्या रक्कमेचा शासकिय भरणा करणार आहे असे वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर यांनी सांगितले आहे. दंडात्मक कारवाई केल्यामुळे अवैध वृक्षतोड बंद झाली असून एका दिवसाला पाचशे झाडे वाचत आहेत.

वरील कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री.तु.वि.जाधवर, वनपाल सांगोला श्री.एस.एल. मुंढे, वनपाल जुनोनी श्री.एस.एल. वाघमोडे, श्रीम. ए. आर. पिरजादे, वनरक्षक सांगोला श्री. जी. बी. व्हरकटे, वनरक्षक अचकदाणी श्रीम.व्ही. पी. इंगोला, वनरक्षक कटफळ श्री.आर.व्ही. कवठाळे, वनरक्षक महुद श्री. के. एन. जगताप, वनरक्षक घेरडी श्री.एस.एस. मुंढे, वनरक्षक ह. मंगेवाडी श्री. ए. के. करांडे, वनरक्षक कोळा श्रीम. एम. आर. श्रीमंगले व वनमजूर यांनी कार्यवाही केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!