जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सायली पाटील यांना शासनाचा वैयक्तिक पुरस्कार जाहीर

सांगोला(प्रतिनिधी):-जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सायली पाटील यांना शासनाचा वैयक्तिक पुरस्कार जाहीर झाला आहे.सांगोला शहरातील मा.नगरसेविका पूजा राजेंद्र पाटील यांच्या सुकन्या श्रीमती सायली राजेंद्र पाटील या कार्यकारी अभियंता स्थापत्य म्हणून मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर येथे कार्यरत आहेत.

5 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी व विविध प्रयोजनासाठी आवश्यक असलेली निकड भागविण्यासाठी जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाने विविध प्रकल्प बांधकाम करून त्याचे व्यवस्थापन केले व विविध योजना राबवताना जलसंपदा विभागातील अभियंत्यांनी तांत्रिक तसेच प्रशासकीय कौशल्य पणाला लावले व उत्कर्ष कार्यपद्धती वैयक्तिक कौशल्य व विशेष गुणवत्ता आढळून आली. अशा अभियंत्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने श्रीमती सायली राजेंद्र पाटील यांची निवड केली व त्यांना महाराष्ट्र शासनाने सन 2021 साठी वैयक्तिक उत्कर्ष कार्यकारी अभियंता म्हणून पुरस्कार प्रदान करून गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला.

2023 मध्ये मुळा पाटबंधारे विभागाची सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी 111.38% वसुली व 2023 मध्ये शंभर टक्के वसुली केलेले आहे. कार्यकारी अभियंता श्रीमती सायली पाटील यांना पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button