सांगोला तालुकाशैक्षणिक

सौ.सरला शिर्के नारीशक्ती सन्मान पुरस्काराने सन्मानित

सांगोला  :सोलापूर स्टेट इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशन व महाराष्ट्र वूमन टीचर्स फोरमच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील 11तालुक्यातील प्रत्येकी एक,शिक्षण क्षेत्रात कार्यरत कर्तृत्ववान महिलांना जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार २०२२ – २३ देवून गौरवण्यात आले. यामध्ये सौ.सरला धनाजी शिर्के -उपशिक्षक जि.प.प्रा.शाळा मेडशिंगी,
ता.सांगोला यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. दिलिप स्वामी साहेब यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने सन्मानीत केले.हा नयनरम्य ऐतिहासिक सोहळा वि.गु.शिवदार  कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स जुळे सोलापूर येथे पार पडला. या दिमाखदार सोहळ्यासाठी महानगरपालिका आयुक्त शीतल उगले मॅडम,वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस, सकाळचे निवासी संपादक श्री.अभय देवाणजी व स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन श्री.राजशेखर शिवदारे सर, फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धराम माशाळे,बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे- वाघ,जिल्हा समन्वयक राजकिरण चव्हाण व अनघा जहागीरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या यशाबद्दल पंचायत समिती सांगोला गटशिक्षणाधिकारी श्री. महारुद्र नाळेसाहेब,विस्तार अधिकारी श्री.कुमठेकर साहेब,श्री.गायकवाड साहेब,श्री.नवले साहेब,श्रीम.वाघमारे मॅडम तसेच केंद्रप्रमुख गडहिरे साहेब व केंद्रातील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती,पालक वर्ग यांचे कडून अभिनंदन होत आहे.व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!