सांगोला तालुका अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने प्राची गोरवे यांचा सत्कार संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- खडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील शिक्षक श्री केरबा गोरवे ( जिल्हा परिषद शिक्षक) यांची कन्या, कुमारी प्राची गोरवे (बी. टेक. सिविल इंजिनियर ) या (आय.बी.पी.एस.) संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन, त्यांचे उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय सांगोला, जिल्हा सोलापूर येथे प्रतिलिपी लिपिक या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल, सांगोला तालुका अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने, अध्यक्ष चरण भडंगे यांच्या हस्ते कुमारी प्राची गोरवे मॅडम यांचा तालुका कार्यकारणी पदाधिकार्यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
सांगोला तालुक्यातील होलार समाजातील व इतर कोणत्याही समाजातील व्यक्तीचे, भूमी अभिलेख कार्यालयातील माझ्या अधिकाराखालील कोणतेही काम असो, मी ते लवकरात लवकर प्रामाणिकपणे करून देण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन प्राची गोरवे मॅडम यांनी सत्कार प्रसंगी दिले.अध्यक्ष चरण भडंगे यांनी अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने प्राची मॅडम यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार प्रसंगी अध्यक्ष चरण (दादा) भडंगे, खजिनदार शिवाजी गेजगे (सर), प. महा. उपाध्यक्ष रघुनाथ ऐवळे, जिल्हा संपर्कप्रमुख परमेश्वर गेजगे, लखन बनसोडे, गोविंद केंगार, बिरू गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.