मंदिर समितीच्या कर्मचा-याचा प्रामाणिकपणा; सोने वस्तू भाविकास परत

पंढरपूर (संजय कोकरे ) :- श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात श्रींच्या मुखदर्शनरांगेत श्रीमती निता संतोष कोकीळ, मु.पो.जांबे, ता.मुळशी, जि.पुणे यांचे 2.5 तोळे सोन्याचे गंठण हरविले होते.
सदर सोन्याची वस्तू तेथील मंदिर समितीच्या कर्मचारी श्रीमती इंदू रणदिवे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयात जमा केली होती. सदर वस्तू व संबंधित भाविकाची ओळख पटल्यानंतर सर्व शाहनिशा करून संबंधित भाविकास परत करण्यात आली आहे.