सांगोला तालुका

सांगोला लायन्स क्लब व लवटे हॉस्पिटलकडून हाडांची ठिसुळता तपासणी शिबिर;

सांगोला ( प्रतिनिधी ) वाढत्या वयाबरोबर हाडांची झीज झाल्यामुळे किंवा स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी हाडांच्या अनेक तक्रारी होत असतात.अयोग्य आहार घेणे ,व्यायाम न करणे यामुळे हाडे ठिसूळ बनतात व हाडे सहज फ्रॅक्चर होऊ शकतात ,सांधेदुखी सारख्या अनेक तक्रारी होऊ शकतात.यासाठी वेळीच तपासणी करून हाडांची काळजी घेणे निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ सुनील लवटे यांनी केले लायन्स क्लब ऑफ सांगोला व लवटे आर्थोपेडिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरवसे – केदार यांच्या निवासस्थानी(खारवट-वाडी) येथे हाडांमधील ठिसूळपणा तपासणी शिबिरामध्ये उद्घाटन समारंभामध्ये ते बोलत होते.

 

 

 

यावेळी व्यासपीठावर उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक माजी प्रांतपाल ला. प्रबुद्धचंद्र झपके, लायन्स झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेश आटपाडीकर ,सचिव ला.अजिंक्य झपके, खजिनदार ला. नरेंद्र होनराव उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.सुनील लवटे म्हणाले यांनी अनेक वेळेस आहार पदार्थातून कॅल्शियम व व्हिटॅमिन-ड मिळत असते.तसेच हाडांच्या मजबुतीसाठी दूध व दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा असे सांगत योग्य आहाराच्या जोडीला व्यायामाची जोड दिल्यास, सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरल्याने आपली हाडे मजबूत व बळकट होतात असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै.भिमराव सुरवसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.व
नंतर संपन्न झालेल्या शिबिरामध्ये खारवटवाडी परिसरातील शंभरपेक्षा जास्त लोकांच्या हाडातील ठिसूळपणाची तपासणी करण्यात आली.व योग्य सल्ला देण्यात आला.

 

या शिबिरासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार शंकरराव सावंत, सांगोला विद्यामंदिरचे पर्यवेक्षक पोपट केदार, मधुकर केदार,विठ्ठल खडतरे,सचिन सुरवसे, रमेश सुरवसे,वसंत सुरवसे,महादेव बाबर,कुमार ढोले,नामदेव खडतरे,अशोक खडतरे ला.बाळराजे सावंत,ला.प्रा.प्रसाद खडतरे सुरवसे – केदार परिवारतील सर्व सदस्य इ.मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता चहापान व अल्पोपहाराने झाली.

लायन्स प्रांत३२३४ड१चे माजी प्रांतपाल ला.विजयकुमार राठी यांनी या शिबिरास भेट दिली. यावेळी लोकांच्या हितासाठी व आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गरजेचे व अनोखे शिबिर आहे असे गौरवोद्गार काढत या शिबिराच्या आयोजनबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

 

हाडांची ठिसूळता वेळीच लक्षात आली तर त्यावरती वैद्यकीय सल्ल्यानुसार उपाययोजना करता येते.आज या शिबिरामधून खारवटवाडी परिसरातील अनेक लोकांच्या हाडातील ठिसूळपणाची तपासणी होईल.त्यांना तज्ञ डॉक्टरांचा योग्य सल्ला मिळेल हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील अशा प्रकारचे आगळेवेगळे शिबिर पहिल्यांदाच लायन्स क्लब कडून संपन्न होत आहे.यांचा मला अभिमान आहे.
ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,माजी प्रांतपाल

 

सांगोला लायन्स क्लबची नेत्र शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच लोकांसाठीची पाणपोई यामध्ये आजवर कै.भिमराव सुरवसे यांचे खूप मौलिक योगदान आहे. तोच वारसा जपत सुरवसे – केदार परिवार व त्यांचे चिरंजीव ला.यतिराज सुरवसे हे देखील तेवढ्याच तत्परतेने व समाजाच्या सेवेसाठी कार्यरत आहेत,याचा मनस्वी आनंद आहे..
ला.प्रा.धनाजी चव्हाण,झोन चेअरमन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!