सांगोला तालुकाराजकीय

स्व.गणपतराव देशमुख हे राजकारणातले संत -आमदार रामहरी रुपनवर

नाझरे (प्रतिनिधी):- गणपतरावांनी तुम्हाला उभे केले त्यामुळे तुम्ही सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, सोसायटी चेअरमन झाला आहात. आमच्यासारखे आमदार तयार होण्यात ही आबासाहेबांचा मोठा वाटा असून स्व.भाई.गणपतराव देशमुख हे राजकारणातले संत होेते असे मत आमदार रामहरी रुपनवर यांनी नाझरे ता सांगोला येथे व्यक्त केले.

प्रारंभी स्व.आबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन तसेच भव्य मोटरसायकल रॅली संपन्न झाली. यावेळी सोसायटी ऑफिसचे उद्घाटन ही करण्यात आले.

स्व.वसंतराव पाटील व हणमंतराव बंडगर यांनी जिल्हा परिषद मध्ये दरारा निर्माण करून आणि प्रश्न सोडविले तसेच आबासाहेबांमुळे सांगोला तालुक्यात पाणी आले व सूतगिरणीचा देशात क्रमांक आणला व एकच माणूस एकच पक्ष व एकच झेंडा घेऊन सलग 11 वेळा निवडून येऊन विक्रम केला व यासाठी यापुढे आबासाहेबांचे युग आणा असा मौलिक सल्लाही आमदार रुपनवर यांनी दिला.
माणूस म्हणून कसे जगायचे हे आबासाहेबांकडून शिकावे व काँग्रेस व शेकाप यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी असे मत डॉ अनिकेत देशमुख यांनी व्यक्त केले.

स्व.वसंतराव अण्णा सिद्धेश्वर पाटील व हणमंतराव बंडगर यांनी जीवाचे रान करून आबासाहेबांना निवडून आणले व यापुढेही सर्वांनी साथ द्यावी असे मत डॉ बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले .

सर्वांचे स्वागत माजी सरपंच हणमंत सरगर यांनी केले.यावेळी माजी उपसभापती सुनील चौगुले, प्रा विजय गोडसे,सुब्राव बंडगर यांनी मत व्यक्त केले.यावेळी सरपंच नवनाथ बनसोडे, उपसरपंच गणीसो काझी व सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच शामराव वाघमारे , गोपाळ सरगर, विजय देशमुख, डॉ शिवाजीराव ढोबळे, पिंटू बंडगर , राजू बंडगर, उत्तम पाटील, विजय बंडगर, सुनील बंडगर, रवी बंडगर, सोसायटी चेअरमन पांडुरंग बंदवडे, शिवाजी शिंदे , आबा सांगोलकर, तानाजी सांगोलकर, संजय पाटील, उल्हास धायगुडे, नितीन रणदिवे, दादासो बाबर, शिवाजी सरगर, दर्‍याबा बंडगर, सौ.सीतादेवी चौगुले, भारत बंडगर, इंजि.रमेश जाधव, आबासो आलदर, जालिंदर बाबर, पवार भाऊसाहेब, रामचंद्र केंगार, बालेखान शेख, मिसाळ सर, संजय वलेकर, कृष्णदेव कारंडे, मनोहर राऊत, संतोष शेंडगे, मनोज ढोबळे, विविध गावचे सरपंच, सर्व सदस्य, सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य ग्रामस्थ, युवक वर्ग, महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सोसायटी चेअरमन सुनील बनसोडे तर आभार शिक्षक नेते अशोक पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!