आनंदा (भाऊ) माने यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

आनंदा (भाऊ) माने यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवून शहर व तालुक्यात नवचैतन्य आणले आहे. युवकांचे हृदयसम्राट आनंदा (भाऊ) माने यांची राजकीय इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी, अशी सदिच्छा पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली.
सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते तसेच राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी विविध कार्यक्रम राबवण्यात आले. रंगभरण स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी डॉ. बाबासाहेब देशमुख हे बोलत होते.
गुरूवार दि. ०३ ऑगस्ट रोजी आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी ११ वाजता शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. दुपारी मूकबधीर शाळा सांगोला येथे मेजर आनंदा व्हटे यांच्या वतीने नगरसेवक आनंदा माने यांच्या हस्ते भोजन देण्यात आले. तसेच सायं. ठिक ४ वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु. कॉलेज सांगोला येथे ह.भ.प .निवृत्ती महाराज इंदूरीकर यांचे सुश्राव्य असे किर्तन संपन्न झाले.
शनिवार दि. 02 ऑगस्ट रोजी आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेड व प्रदीप मिसाळ यांच्यावतीने कडलास हायस्कूलला वॉटर फिल्टर भेट म्हणून देण्यात आला.
तसेच सांगोला येथील ठेंगील आय केअर व व्हिजन सेंटरचे डॉ.अक्षय ठेंगील व डॉ. सौ. तेजस्विनी ठेंगील यांनी आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
त्याचबरोबर आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त वंदे मातरम चौक येथील चहा विक्रेते तानाजी पाटोळे यांनी पूर्ण दिवस मोफत चहाचे आयोजनही केले होते.
रविवार दि. ३० जुलै २०२३ रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे सकाळी सांगोला तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये तीन वयोगटामध्ये क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक गटातील पहिले बक्षीस सायकल, द्वितीय बक्षीस स्मार्टवॉच, तृतीय बक्षीस स्कूलबॅग व उत्तेजनार्थ बक्षीस जेवणाचा डबा व रंगपेटी असे होते. तसेच यामध्ये पहिली ते तिसरीच्या वयोगटासाठी प्रत्येकी सहभागी विद्यार्थ्यास आकर्षक भेट वस्तू देण्यात आली.
या रंगभरण स्पर्धेचे बक्षीस वाटप हे गुरूवार दि. ३ ऑगस्ट रोजी सायं. ४ वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशाला याठिकाणी ह.भ.प निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमापूर्वी करण्यात आले.
यामध्ये पहिल्या गटामध्ये म्हणजे पहिली ते तिसरी या गटामध्ये प्रथम क्रमांक- समर्थ अनिल नवले (इयत्ता- दुसरी), द्वितीय क्रमांक- सविक योगेश लोखंडे (इयत्ता- तिसरी), तृतीय क्रमांक- स्वरा किरण वाघमोडे (इयत्ता- तिसरी), उत्तेजनार्थ क्रमांक- अरोही अतुल इंगोले (इयत्ता- तिसरी), तसेच दुसऱ्या गटामध्ये म्हणजे चौथी ते सहावी या गटामध्ये प्रथम क्रमांक- प्रसाद शिवाजी तोडकरी (इयत्ता- चौथी), द्वितीय क्रमांक- केतकी प्रकाश साळुंखे (इयत्ता- सहावी), तृतीय क्रमांक- श्रावस्ती उत्कर्ष चंदनशिवे (इयत्ता- सहावी), उत्तेजनार्थ क्रमांक- अनुष्का अरुण पाटील (इयत्ता- सहावी) व शेवटच्या गटामधील म्हणजेच सातवी ते दहावी या गटामध्ये प्रथम क्रमांक- सृष्टी सुहास पाटील (इयत्ता- नववी), द्वितीय क्रमांक- स्नेहल शहाजी रणदिवे (इयत्ता- नववी), तृतीय क्रमांक- श्रावणी प्रमोद डोंबे (इयत्ता- दहावी), उत्तेजनार्थ क्रमांक- तेजश्री मारुती गोडसे (इयत्ता- नववी) यांना मिळाले आहेत. या स्पर्धेचे बक्षीस वितरण पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
रंगभरण स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर सांगोला विद्यामंदिरचे चित्रकला शिक्षक आर. एम. जाधव सर यांनी स्पर्धेप्रसंगी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचा ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी बांधव यांच्यासह आदी मान्यवर यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. वाढदिवसादिवशी मित्रमंडळी, नातेवाईक, मान्यवर यांच्याकडून शुभेच्छा स्वरूपात देण्यात आलेली झाडे सांगोला नगरपालिकेच्या वृक्ष बँकेस भेट देण्यात आली. आनंदा (भाऊ) माने यांचा वाढदिवस यशस्वी करण्यासाठी आनंदा (भाऊ) माने अभिष्टचिंतन सोहळा समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचबरोबर गटनेते आनंदभाऊ माने व त्यांच्या पत्नी राणीताई माने यांचा मान्यवरांच्या हस्ते एकत्रितपणे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील अबाल वृद्धांकडून भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
सांगोला नगरपालिकेचे नगरसेवक तथा गटनेते व राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण, मूकबधिर प्रशाला सांगोला येथील विद्यार्थ्यांना भोजन, ह.भ.प इंदूरीकर महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन, यासह आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त 3 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या मुलींच्या नावे ठेव ठेवण्याचा संकल्प आदी उपक्रमांनी युवकांचे हृदयसम्राट आनंदा (भाऊ) माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे, दूरध्वनीवरून तसेच प्रत्यक्ष भेटून सदिच्छा दिल्या, सत्कार केला व वृक्ष भेट दिले त्याबद्दल अबालवृद्धांचे, मान्यवरांचे, संस्थांचे पदाधिकारी, महिला-भगिनी यांचे मनःपूर्वक जाहीर आभार व्यक्त करतो.
– आनंदा (भाऊ) माने