सांगोला तालुका

कमलापूर पूर येथे स्व. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न 

स्व. डॉक्टर भाई गणपतराव देशमुख यांच्या दुसऱ्या पुण्यतिथी 96 व्या जयंतीनिमित्त  कमलापूर येथे  7 ऑगस्ट 2023 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भव्य रक्तदान शिबिर त्यामध्ये 51 रक्तदात्यांनी  सहभाग नोंदवून समाजकार्याला हातभार लावला. तसेच डॉ. शैलेश डोंबे,डॉ.सतीश खटके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रुग्णांच्या रक्तातील शुगर तपासणी, बीपी तपासणी व शरीरातील इतर तपासण्या 160 रुग्णांच्या झाल्या. कमलापूर गावातील गरजू महिला वर्गासाठी  मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे दिनांक 07 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आठ दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आहे. यामध्ये एकूण 76 आणि  महिलांनी सहभाग नोंदवला.
या विविध कार्यक्रमासाठी पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख,शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते  डॉ.अनिकेत(भैय्या) देशमुख, प्राचार्य हेमंतकुमार आदलिंगे, कमलापूर गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ.कलावती बंडगर, उपसरपंच देवीदास ढोले, मा. तंटामुक्तीचे अध्यक्ष हणमंत ( बंडू) तंडे, महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीचे नूतन संचालक बाबुराव बंडगर,किसन म्हेत्रे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष सोमनाथ अण्णा अनुसे,चेअरमन विजय अनुसे,सखाराम आदलिंगे,शिवाजी गोडसे,माजी उपसरपंच ज्ञानेश्वर तंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य तातोबा पांढरे, माजी सरपंच सदाशिव ऐवळे,ग्रामपंचायत सदस्य,मधुकर तंडे, अंकुश (राजू) गोडसे, साधू गोडसे, श्रीपती आदलिंगे रावसाहेब अनुसे, नितीन काळे, नाथा देवळे, गोरख पुजारी, डॉ.सतीश तंडे,प्रकाश (पप्पू)ऐवळे, प्रा.तानाजी पांढरे, पुरोगामी युवक संघटनेचे काशिलिंग पांढरे, सागर अनुसे,महादेव पडवळे, व्हा. चेअरमन दत्तू गोडसे, धर्मराज टकले,सुरेश केसकर,बाळासो पांढरे, तानाजी टाकळे,अरविंद चंदनशिवे, बाबासो चंदनशिवे, युवक नेते अनिल पडवळे, विजय देवकते दगडू देवकते, नवनाथ पडवळे,रावसाहेब पडवळे, अंकुश टाकळे,  सोमनाथ पडवळे,वैभव जाधव,सुनिल तंडे सर, राजाराम ढोले, चेअरमन ईश्वर तंडे,बाबुराव तंडे, बाबासो पांढरे, गुरुजी,गंगाधर तंडे, तुकाराम बंडगर, सदाशिव बंडगर,बबलू बंडगर,लखन मंडले,कुमार जाधव रूनिल चंदनशिवे, मोहित चंदनशिवे,आबासो चंदनशिवे, रघुनाथ ऐवळे,भानुदास चंदनशिवे,शंकर ऐवळे,शंकर पांढरे,पांडुरंग देवळे, सगळी कमलापूर गावातील आरोग्य सेविका,जि.पचे सर्व शिक्षक,ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी पुरोगामी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र तंडे गुरुजी आभार प्रदर्शन सोमनाथ (अण्णा)अनुसे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!