सांगोला विद्यामंदिर रवींद्रनाथ टागोर पुण्यतिथी उत्साहात संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) प्रत्येकाच्या हृदयात आपला अमीट ठसा उमटवणारे,एक महान कवी,थोर साहित्यिक, कथाकार, गीतकार, संगीतकार,नाटककार,निबंधकार, चित्रकार, थोर विचारक,विलक्षण प्रतिभेचे धनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेचे पूजन सांगोला तालुक्याचे तहसीलदार संजय खडतरे यांचे हस्ते करण्यात आले.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ,सागोला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस संस्था सचिव म.शं.घोंगडे यांचे हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद ज्युनिअर कॉलेज उत्सव विभाग प्रमुख प्रा.धनाजी चव्हाण यांचेसह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.