आपुलकी प्रतिष्ठान, रोटरी क्लब व सांगोला बस आगार यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचाऱ्यांची इसीजी, शुगर व नेत्र तपासणी

सांगोला (प्रतिनिधी )- आपुलकी प्रतिष्ठान सांगोला, रोटरी क्लब सांगोला व सांगोला बस आगार यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला आगारातील कर्मचाऱ्यांची इसीजी, शुगर व नेत्र तपासणी करण्यात आली.
सोमवारी सांगोला बस स्थानक विश्रांती गृहात झालेल्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन उपस्थित मान्यवर डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात ९३ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. केदार हॉस्पिटलचे डॉ. निरंजन केदार, डॉ.अण्णासो लवटे, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, डॉ. अनिल कांबळे यांनी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून योग्य तो सल्ला व मार्गदर्शन केले.
डॉ. तानाजी वाघमोडे यांच्या चंद्रभागा नेत्रालयाचे प्रदीप पवार व अनिकेत माणकापुरे यांनी नेत्र तपासणी केली. त्याचबरोबर संजीवनी क्लिनिकल लॅबोरेटरीचे महादेव कोळेकर यांनी शुगर तपासणी केली. इसीजी तपासणीसाठी दक्षता हॉस्पिटल मधील परिचारिका पूजा गोरे व हर्षदा व्हनमाने यांचे सहकार्य लाभले..
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. एस. के. पाटील सर,रमेशअण्णा देशपांडे, हमीद शेख, सांगोला बस आगाराचे कार्यशाळा अधीक्षक पृथ्विराज पारसे, वाहतूक निरीक्षक सागर कदम, सहाय्यक वाहतूक निरीक्षक समाधान काशिद, वरिष्ठ लिपिक संतोष ढोले, वाहतूक नियंत्रक रावसाहेब चव्हाण, उत्तम बुरंगले, विष्णू जाधव यांचेसह आपुलकी प्रतिष्ठान व रोटरी क्लब सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.