सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न

सांगोला (वार्ताहर) विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यात शिक्षक व पालकांचा समन्वय महत्त्वाचा असून विद्यार्थ्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी आपणासर्वांचे कष्ट महत्त्वाचे आहेत असे उद्गार प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाच्या शिक्षक पालक सहविचार सभेवेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.
सभेचे प्रास्ताविक व स्वागत शिष्यवृत्ती विभागाचे नियंत्रक पोपट केदार यांनी केले.
पुढे बोलताना आपल्या मनोगतातून मुख्याध्यापक श्री घोंगडे सर यांनी विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी अभ्यासरूपी कष्ट केल्याशिवाय यश मिळणार नाही हे सांगत परिश्रम हा यशाचा पाया असल्याचे सांगितले.विद्यार्थी हे दैवत म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा संस्थेच्या माध्यमातून तात्काळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करण्याचे सांगितले.स्पर्धा परीक्षेबरोबरच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वर्षभरामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी पालकांना केले.
विभाग प्रमुख नागेश पाटील यांनी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाच्या वर्षभराचे नियोजन व कार्यवाही आपल्या मनोगतामधुन मांडले.
यावेळी उपस्थित पालकांपैकी सिद्धेश्वर इंगोले सर, सुधीर गायकवाड सर, सोमनाथ शिंदे, चंद्रकांत भोजने सर, नागेश लवटे सर व चैत्रजा बनकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
प्रशालेचे बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख वैभव कोठावळे यांनी आपल्या मनोगतातून पालकांच्या शंका दूर करत नव्याने दाखल झालेल्या इयत्ता पाचवीचे विद्यार्थी हे विद्यामंदिर पॅटर्नचा अवलंब करत नक्कीच यशस्वी होतील याबाबत पालकांना आश्वासक केले.
सभेचे सूत्रसंचालन चैतन्य कांबळे यांनी तर आभार मेहजबीन मुलानी यांनी मानले. सभेवेळी संस्थाबाह्यपरीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे यांच्यासह विभाग प्रमुख सुवर्णा कांबळे, काकासाहेब नरुटे, आशुतोष नष्टे, रूपाली देशमुख अश्विनी साळुंखे, धनश्री ढोले, दत्तात्रय कांबळे, शितल मेहेरकर या शिक्षकांसह पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सभा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.