सांगोला विद्यामंदिरमध्ये टागोर पुण्यतिथीनिमित्त गीतगायन स्पर्धा उत्साहात संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे इयत्ता अकरावी व बारावी गटासाठी भावगीत,भक्तीगीत, देशभक्ती गीत व लोकगीत या गीतगायन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे सचिव म.शं. घोंगडे, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, वाङमय विभाग प्रमुख प्रा.शिवशंकर तटाळे, लायन्स झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण,सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये इयत्ता अकरावी व बारावी गटामध्ये ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले व उत्साहात भावगीत ,भक्तीगीत, देशभक्तीपर, लोकगीताचे गायन केले. यावेळी ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य शहिदा सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.कु. राधा विटे यांनी केले तर प्रा. शिवशंकर तटाळे यांनी आभार प्रदर्शन केले.सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा. गणेश घेरडीकर, प्रा.कु.सुप्रिया गायकवाड, प्रा.कु.सुवर्णा बेहेरे यांनी केले.यामध्ये भावगीतामध्ये कुमारी वैभवी राजकुमार रोडगे ११ वी संयुक्त प्रथम क्रमांक , गुरूनाथ संतोष व्हटे ११ वी शास्त्र द्वितीय क्रमांक,स्वाती मुकुंद पाटकुलकर १२ वी शास्त्र तृतीय क्रमांक ,भक्तीगीतामध्ये साक्षी शिवाजी भोसले १२ संयुक्त प्रथम क्रमांक, आकांक्षा अनिल येलपले ११ वी शास्त्र द्वितीय,स्वाती मुकुंद पाटकुलकर १२ शास्त्र तृतीय , देशभक्तीपर गीतामध्ये अनुष्का संजय गायकवाड ११वी शास्त्र प्रथम क्रमांक, अनुष्का संजय लिगाडे ११ वी संयुक्त द्वितीय क्रमांक, गुरूनाथ संतोष व्हटे ११ वी शास्त्र व स्नेहल सुनील पाटोळे ११ वी शास्त्र विभागून तृतीय क्रमांक तर लोकगीतामध्ये गुरुनाथ संतोष व्हटे ११ वी शास्त्र प्रथम क्रमांक, रेश्मा विठ्ठल व्हनमाने ११ वी शास्त्र द्वितीय क्रमांक, वैष्णवी रघुनाथ पाटील १२ शास्त्र हीने तृतीय क्रमांक मिळविला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद,पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने , शिक्षण शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले..