सांगोल्यात हॅण्डलूम “बेलवणी – सांगोला” सिल्क साडी निर्मितीचा शुभारंभ

सांगोला – सांगोला शहरात हातमागावर कापड निर्मिती मोठ्या प्रमाणात होत होती. ही निर्मिती कालबाह्य होत असताना पैठणी, येवलाच्या धरतीवर सांगोल्यात “बेलवणी- सांगोला” हॅन्डलूम सिल्क साडीची निर्मिती करणारा प्रकल्प तरुण उद्योजक तानाजी केदार यांनी सुरू केला असून या तरुण नवउद्योजकाने शहर व परिसरातील तरुणापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
हा उद्योग सुरू करून अनेक सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम मिळणार असून तसेच महिलांसाठी हा प्रकल्प नाविन्यपूर्ण असल्याचे उद्योजक तानाजी केदार यांनी सांगितले. सांगोला येथील सांगोला-जत रोडवर रॉयल गार्डन, खारवटवाडी येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थित, माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना तानाजी केदार यांनी सांगितले की, तरुणांचा शहराकडे जाणारा लोंढा थांबवण्यासाठी बेरोजगारीचा शिक्का पुसण्यासाठी ‘स्वयंरोजगार’ कसा निर्माण करता येईल याकरिताचा हा उपक्रम असून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकेल व जगामध्ये सांगोला तालुक्याला एक संस्कृतीक तालुका म्हणून ओळख निर्माण करता येईल
तरुणांना व महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, फॅशन व डिझाईन क्षेत्राची आवड असणाऱ्यांच्या बुद्धीला वाव व कल्पकतेला संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे,
यावेळी मंगळवेढा पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता पाटील व वैजिनाथ घोंगडे यांनी तरुणांना मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. यावेळी उद्योजक किसन साळुंखे, रावसाहेब पवार, नानासो केदार, अशोक केदार, आप्पासाहेब केदार, दादासाहेब घाडगे, चंद्रकांत खडतरे, सिद्धेश्वर सुरवसे, धनंजय केदार, प्रवीण, योगेश केदार, गिरजाबाई केदार, सविता सुरवसे, छबाबाई केदार, नंदा केदार इत्यादी सह महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.