फॅबटेक ज्युनिअर कॉलेजमध्ये पुन्हा एकदा…… जुन्या आठवणींचा पारिजात
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा कॉलेजमध्ये आले. विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते, प्रत्येक जण आपले कॉलेज कसे आहे हे डोळ्यात साठवून घेत होते, वर्गमित्र भेटल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता
या स्नेह मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फॅबटेक जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील व सुपरवायझर सौ वनिता बाबर हे लाभले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविक भाषण कॉलेजचे प्रा.संजय देशमुख यांनी केले. कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अल्पावधीतच फॅबटेक ज्युनिअर कॉलेज हे बहुश्रुत होत आहे हे सांगितले . फॅबटेक कॉलेजमधील विद्यार्थी आपले करिअर यशस्वी करत आहे वैद्यकीय क्षेत्रात एम.बी.बी.एस,बी.एच.एम.एस, इंजिनीयरिंग , फिजियोथेरेपीस्ट एम.बी.ए, फार्मसी , बी.एस.सी ॲग्री, अशा अनेकविविध क्षेत्रामध्ये विद्यार्थी कार्यरत . याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून कॉलेज बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कु.दिपाली घाडगे या माजी विद्यार्थिनी कॉलेज विषयी कविता सादर केली ,तर कु हबीबा शेख या माजी विद्यार्थिनीने गीत गायन केले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रूपनर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे , कॉलेजचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रेश्मा तोडकर यांनी केले तर आभार सौ.नयन देशमुख यांनी व्यक्त केले याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.