सांगोला तालुका

अडचण घेऊन येणार्‍या व्यक्तींना पक्ष न पाहता मी मदत करतो- आ.शहाजीबापू पाटील; महूद येडगेवाडी-2 येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश  

सांगोला:-चौका- चौकातून चालणार्‍या घाणेरड्या विचाराच्या राजकारणाने तालुका विकासाच्या बाबतीमध्ये मागे पडला आहे.अशा या चुकीच्या विचारापासून बाजूला होत या तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.भविष्याचा वेध घेणारा हा कार्यक्रम आहे. सातत्याने एक हाती सत्ता असतानाही चौकात उभा राहून गोरगरिबांची कामे केली नाहीत. हा बुरसटलेला विचार सोडून हे तरुण सेनेत आले आहेत.काम अथवा अडचण घेऊन येणार्‍या व्यक्तीचा आपण पक्ष न पाहता मदत करतो.विकासाची शक्ती ही मतदारांकडून मिळते. उजनीचे उचल पाणी,महूद-सांगोला रस्ता ही महत्त्वकांक्षी कामे लवकरच साकार होतील. असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.

महूद ता सांगोला अंतर्गत असलेल्या येडगेवाडी-2 येथील शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दत्तात्रय येळे,दत्तात्रय येडगे, बाळासाहेब येडगे,बंकू ठोंबरे,अनिल येळे,नवनाथ खांडेकर,नारायण कोळेकर,सुनील ठोंबरे,लिंगराज बेंदगुडे,शंकर येडगे,विकास येडगे, बापू कोळेकर,राहुल ठोंबरे,सुरेश कोळेकर,नवनाथ येडगे,नानासाहेब ढाळे,समाधान ठोंबरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते पक्षांतर केलेल्या सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण कधीही संघर्षाचा दिखाऊपणा न करता आग्रही राहून काम केले आहे. त्यामुळेच पाणी योजना पूर्ण होऊन कार्यान्वित झाल्या आहेत.लवकरच तालुक्यातील वंचित गावांसाठी सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या उजनी उचल पाणी योजनेचेेेे काम सुरू होईल.तालुक्यातील कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये यासाठी आपण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महूद गटाचे नेते संजय मेटकरी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे, दिलीप नागणे, महेंद्र बाजारे , राजकुमार मरगर, नवनाथ येडगे, अरुण नागणे,  उमेश पाटील, संजय चव्हाण, यशवंत खबाले, काका नागणे, उमेश चव्हाण ,गणेश लवटे, आनंद लवटे, नैनेश कांबळे, धनाजी कांबळे, हणमंत कारंडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ओंकार पाटील यांनी तर आभार धनाजी कांबळे यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!