सांगोला शहरांमध्ये सध्या चोरींचे प्रमाण वाढलेले आहे.यामध्ये चोरट्यांनी नवीन शक्कल लढवलेली आहे, या गुन्हेगारी टोळीमध्ये लहान मुलांचा व महिलांचा समावेश आहे या महिला लहान मुलांना पुढे करून काहीतरी घेण्याच्या बहाण्याने अथवा डॉक्टरांना तपासण्याच्या भावनेने प्रवेश करतात व आपल्या नजर चुकवून आपल्या गल्ल्यातील पैसे काढून घेतात, अशीही चोरट्यांची टोळी सध्या सांगोला शहरांमध्ये कार्यरत आहे.
त्यामुळे व्यापारी व व्यवसाय बंधूंना नम्रतेची विनंती अशी कोणीही व्यक्ती आढळल्यास लगेचच पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.
या संदर्भात अधिक माहिती अशी की काल रविवार दि. 20 ऑगस्ट रोजी डॉक्टर जेवायला गेले असताना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जांगळे क्लिनिक परीट गल्ली येथे वाढेगाव नाक्याकडून छत्रपती शिवाजीमहाराज चौकात जाणाऱ्या रोड वरून तीन महिला व दोन लहान मुले डॉक्टर आहेत का ? डॉक्टर आहेत का? लहान मुलाला दाखवायचे आहे. असे म्हणत क्लिनिकमध्ये घुसल्या दवाखान्यांमध्ये गर्दी व सलाईनचे पेशंट असल्यामुळे डॉक्टरांचा असिस्टंट हा पेशंटला सलाईन लावत असताना बाहेरील आवाज ऐकून बाहेर येत असताना दोन महिलांनी त्याला डॉक्टर आहेत का? असे म्हणत अडवण्याचा प्रयत्न केला त्याच वेळीस एक महिला डॉक्टरांच्या खुर्चीच्या बाजूला येऊन टेबलाच्या ड्रॉवर ओढून पाहत होत्या परंतु ड्रॉवर लॉक असल्यामुळे त्यांना उघडता आला नाही. व मोठा अनर्थ टळला.
परंतु अशा प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत.यापूर्वी बरोबर आठ महिन्यापूर्वी अशाच महिलांनी एका डॉक्टरांच्या टेबल मधील ड्रॉवर मधील हात घालून सोळा हजार रुपये लंपास केले होते. आज बरोबर आठ महिन्यानंतर पुन्हा तसा प्रयत्न करण्यात आला. परंतु यश आले नाही सर्वांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. तसेच सर्व व्यापारी वर्गाने सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे व सांगोला पोलीस स्टेशनला विनंती या भुरट्या चोरांना पकडून व्यापारी बंधूंना दिलासा द्यावा.