शेतकरी बांधवांनी पेरणी केलेल्या खरिप पिकांमध्ये कोळपणी/ खुरपणी करून घ्यावी- कृषी अधिकारी शिवाजी शिंदे

सांगोला(प्रतिनिधी):-सध्या तालुक्यातील काही ठिकाणी थोडा थोडा पाऊस पडत आहे. बरेच ठिकाणी पाऊसाचा खंड आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी पेरणी केलेल्या खरिप पिकांमध्ये कोळपणी/ खुरपणी करून घ्यावी. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकुन राहण्यास मदत होणार असल्याचे तालुका कृषीअधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.

त्याचबरोबर पाऊसाच्या खंड च्या कालावधीत पोटशियम नायट्रेट (13:0:45) या पाण्यात विरघळणारे खताची 1% याप्रमाणे पिकावर फवारणी करावी. यामुळे पिके तग धरून राहू शकतात, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button