विकासाचे राजकारण करण्यासाठी सर्वांनी साथ द्या ; मा आम दिपकआबा साळुंखे पाटील

जिल्हा परिषद लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना नाझरा आणि परिसरातून शेकडो तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सांगोला तालुक्यात विकासाचे राजकारण करण्यासाठी सर्वच समाजातील घटकांनी साथ द्यावी असे आवाहन माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सर्वांना केले. नाझरा येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थित सर्व तरुणांनी आता दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या शिवाय सांगोला तालुक्याला पर्याय नाही. आबांनीच आता सांगोला तालुक्याचे प्रतिनिधित्व करावे असा एकमुखी निर्धार करून जणू आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.

नाझरा आणि परिसरात नेहमीच राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या अरुण चव्हाण, अनिल मंडले, अंकुश चव्हाण, कल्लाप्पा चव्हाण, राजू चव्हाण, सुनील मंडले, नितीन मंडले, गुरुनाथ मंडले, अजय पाटोळे, तात्यासो चव्हाण, योगेश चव्हाण, संतोष हरिहर, महेश बुधावले, एकनाथ चव्हाण, करण चव्हाण, स्वप्निल चव्हाण, उमेश रणदिवे, सुरज रणदिवे, उमेश चव्हाण, सोमनाथ चव्हाण, संजीव हरिहर, दत्ता चव्हाण, सागर मंडले, प्रमोद चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, तसेच सिद्धेश्वर गिड्डे या प्रमुख तरुण कार्यकर्त्यांसह नाझरे व परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर बनसोडे,युवकचे अनिलनाना खटकाळे, तानाजी काका विजय येलपले, भिकाजी बाबर, शिवाजी बनकर, राज मिसाळ, गणेश कोळेकर, विजय पवार, विनायक मिसाळ, बिरा पुकळे, सोमनाथ लोखंडे, योगेश खटकाळे, महादेव पवार, समाधान शिंदे, माऊली बाबर, राजू गुजले, बाबा करांडे, राजाराम वलेकर, अनिल जगदाळे, शहाजी हातेकर, राम बाबर, विनोद रणदिवे, अशोक पाटील, चंद्रकांत चौगुले, संतोष पाटील, नारायण माळी, हिंदुराव घाडगे, ज्ञानेश्वर शिंदे, अजय गोडसे, शिवाजी जावीर, संजय आलदर, योगेश वलेकर, औदुंबर गोडसे, वस्ताद बंडगर, सतीश सावंत, संजय कोकरे, बिरा गेजगे, उत्तम पवार, प्रमोद साळुंखे यांच्यासह पदाधिकारी आणि नाझरे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मा. आम दिपकआबा साळुंखे पाटील यांचे नाझरा गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाके आणि ढोल ताशांच्या आतिषबाजीत संपूर्ण गावातून दिपकआबांची जंगी मिरवणूक काढून नाझारा जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी दिपकआबांचे स्वागत केले.

यावेळी प्रास्ताविकात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागेश रायचुरे म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 76 वर्षे उलटली तसेच राज्यात पंचवार्षिक योजना लागू होऊन ६० हून अधिक वर्षे उलटली तरीही सांगोला तालुका विकासापासून वंचित आहे. तालुक्यातील जनतेचा आजही मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष सुरू आहे. तालुक्यातील जनतेने सर्व पर्याय आजमावून पाहिले प्रत्येकांनी जनतेच्या प्रश्नावर राजकारण केले पण जनतेच्या प्रश्नाचे उत्तर कुणीच शोधले नाही. सांगोला तालुका खऱ्या अर्थाने राज्यातील बारामती अकलूज आणि अन्य प्रगतशील तालुक्याच्या बरोबरीला घेऊन जायचे असेल तर ती धमक फक्त दिपकआबांच्या नेतृत्वात आहे. त्यामुळे जोवर दिपकआबा या तालुक्याचे नेतृत्व करत नाहीत तोवर आपण रात्रीचा दिवस आणि रक्ताचे पाणी करून कामाला लागू असा निर्धार रायचुरे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संभाजी हरिहर यांनीही माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कार्यशैलीचे तोंडभरून कौतुक केले. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे कोणतेही सत्तेचे पद नसताना आज जिल्ह्यात नाही तर राज्यात सर्वाधिक काम करणारा नेता म्हणून ओळखले जातात. कोणत्याही मंत्र्यांच्या दारात नसेल इतकी गर्दी आबांच्या जवळ्याच्या वाड्यावर आणि सांगोला येथील कार्यालयात असते. आबाकडे येणारा माणूस कधीच कोणत्या जातीचा धर्माचा किंवा पक्षाचा आहे ते पाहिले जात नाही. प्रत्येकाला मदत करणे हाच आबांचा स्वभाव आहे आज दिपकआबाकडे कोणतीही सत्ता आणि पद नसताना ते तालुक्याचा विकास करण्यासाठी तत्पर आहेत. त्यांना सांगोला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची आपण संधी दिली तर संपूर्ण राज्याला हेवा वाटेल असा विकास दिपकआबा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा विश्वासही शेवटी संभाजी हरिहर यांनी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजी नाना बनकर रामोशी समाजाचे युवा नेते राजू गूजले, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कोळेकर योगेश वलेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना गतिमान आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी दिपकआबाचा सांगोला तालुक्यातील जनतेला आता फक्त एकच पर्याय उरला असल्याचे सांगितले.

१) दिपकआबांच्या आमदारकीसाठी आरेवाडीच्या बिरोबाला घातले साकडे…!

दिपकआबा हे संपूर्ण जिल्ह्यात जातीपातीच्या आणि पक्षाच्या पलीकडे असलेले एकमेव नेतृत्व आहे. सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आता येथील जनतेला दीपकआबा शिवाय पर्याय उरला नाही. येणाऱ्या निवडणुकीत आबांनी स्वतःसाठी नव्हे तर सांगोला तालुक्याच्या विकासासाठी आणि येथील जनतेच्या हक्कासाठी विधानसभेत जावे असे आवाहन करून आबांच्या आमदारकीसाठी धनगर समाजाचे युवा नेते नवनाथ मोरे यांनी आरेवाडीच्या बिरोबाला साकडे घातले.

२) सांगोला तालुक्याच्या विकासाशी सदैव बांधील

नाझरा जिल्हा परिषद गटातील नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे दिपकआबांनी पक्षात स्वागत केले. संपूर्ण सांगोला तालुका हा आपला परिवार आहे. स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील तसेच स्वर्गीय काकींनी जनसेवेचा दिलेला वारसा आपण अखंडपने पुढे चालू ठेवू असे सांगून राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्याच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत रात्री २ ला जरी फोन केला तरी मी आपल्या सेवेत असेन असा विश्वास यावेळी माजी आमदार दिपकआबांनी उपस्थित तरुणांना दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button