सांगोला बस आगारातील वाहतूक निरीक्षक सागर कदम यांची सहाय्यक वाहतूक अधीक्षक पदी निवड
सांगोला बस आगारात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष वाहतूक निरीक्षक सागर सदाशिव कदम यांची सहाय्यक वाहतूक अधीक्षक या पदी निवड झाली आहे. आतापर्यंत सागर कदम हे एस. टी महामंडळ क्षेत्रातील कामगिरी उत्तमरीत्या पार पाडत आहेत.
सागर कदम यांनी या पूर्वी सोलापूर, सांगोला, अक्कलकोट या ठिकाणी पाच वर्षापासून वाहतूक निरीक्षकपद अतिशय उत्कृष्टपणे सांभाळले आहे दिनांक ३० जुलै रोजी एस टी महामंडळ च्या खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या सहाय्यक वाहतूक अधीक्षक पदाच्या परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची सहाय्यक वाहतूक अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.