सांगोला दक्षता हॉस्पिटलमध्ये महसूल विभाग यांच्या वतीने शासकीय आरोग्य शिबिर संपन्न..

महसूल विभाग सांगोला व दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जय भवानी चौक सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल विभागातील कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते.शिबिराचे उदघाटन तालुक्यातील सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व वैद्यक क्षेत्राची देवता धन्वंतरीची पूजा करून झाली.
सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार दक्षता हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले. सदरच्या शिबिरामध्ये सांगोला तालुक्यातील सर्व महसूल विभागातील अधिकारी- कर्मचारी ,तलाठी ,तहसिल कार्यालयातील सर्व स्टाफ यांची मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली.या शिबिराचा सुमारे ९६ कर्मचारी व पेशंट यांनी लाभ घेतला.
आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोलचे तहसीलदार श्री.संजय खडतरे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगोलाचे वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड नामवंत शल्यचिकित्सक डॉ.अमर शेंडे , दक्षता हॉस्पिटल चे जेष्ठ डॉ.मच्छिंद्र सोनलकर, जेष्ठ नेते श्री बाबुरावजी गायकवाड,श्री तानाजीकाका पाटील,श्री.अरविंद केदार,श्री पिंटू पाटील,श्री रमेश जाधव ,नगरपालिका मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी,तालुका कृषी अधिकारी श्री.शिवाजीराव शिंदे ,डॉ.सुशांत बनसोडे, डॉ.सुदीप चव्हाण, डॉ.शिवराज भोसले ,डॉ अण्णासो लवटे,डॉ संतोष शिंदे,डॉ धनाजी जगताप,डॉ.निरंजन केदार ,डॉ.महादेव जगताप, पत्रकार श्री.जगदीश कुलकर्णी,कॉन्ट्रॅक्टर खंदारे साहेब,महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे आरोग्यमित्र श्री. सुभाष बनसोडे, श्री असिफ पठाण,चंद्रभागा नेत्रालय चे सर्व स्टाफ, दक्षता हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर्स मेडिकल ऑफिसर, सर्व नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.श्री.संजय खडतरे साहेब यांचा वाढदिवस असल्या कारणाने हॉस्पिटल च्या वतीने व विविध मान्यवरांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान-सत्कार करण्यात आला.
भाषणामध्ये खडतरे साहेब यांनी महसूल कर्मचारी यांना कामाचा ताणतणाव यामुळे होणारे आरोग्यसंबंधीच्या समस्या आजार हे टाळण्यासाठी काय उपाय योजना केल्या पाहिजेत यावर मार्गदर्शन केले आणि शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया उपचार केल्याबद्दल दक्षता हॉस्पिटलचे विशेष कौतुक केले. डॉ.अमर शेंडे सर यांनी सांगोला तालुक्यात कोविड काळातील महसूल कर्मचारी- तहसीलदार व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स यांनी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले ,कोविड काळातील आठवणींना उजाळा दिला तसेच महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना शासकीय आरोग्य योजना ,मोफत आरोग्य तपासणी शिबिरे सर्व सामान्य जनतेपर्यंत अजून प्रभावीपणे कश्या पद्धतीने पोहोचवता येईल यांवर सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हॉस्पिटल चे पी.आर.ओ श्री.महावीर गोरे, आभार प्रदर्शन डॉ.संतोष शिंदे व सूत्रसंचालन डॉ.निरंजन केदार यांनी केले.