सांगोला महाविद्यालयास कमांडिंग ऑफिसर कर्नल राजेश गजराज यांची भेट

सांगोला महाविद्यालयास ३८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सोलापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजेश गजराज यांनी भेट दिली.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या एन.सी.सी. छात्रांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत केले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व कार्यालयीन अधीक्षक श्री. प्रकाश शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
एनसीसी छात्रांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, एन.सी.सी. संघटन हे देशातील महाविद्यालयीन युवकांचे सर्वात मोठे संघटन आहे.
देशातील युवाशक्तीला सैन्य प्रशिक्षण देण्यासाठी याचा उपयोग होत आहे. यामधूनच भविष्यातील देशाचे सैनिक निर्माण होणार आहेत. एन.सी.सी. प्रशिक्षणामुळे छात्रांमध्ये एकता आणि शिस्त निर्माण होते. देशाचे सुजान व जागरूक नागरिक घडविले जातात. एन.सी.सी.च्या छात्रांनी सामाजिक ऐक्यासाठी नेहमी कटिबद्ध असले पाहिजे व हे सर्व साध्य करण्यासाठी मेहनतीची आवश्यकता आहे, असा संदेश त्यांनी दिला.
याप्रसंगी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथील एन.सी.सी. छात्र देखील सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांगोला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच ३८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सोलापूर येथील ए.ओ. कर्नल विक्रम जाधव,
एस.एम. अरुणकुमार ठाकूर, सुभेदार अण्णाराव वाघमारे, हवालदार दिपक पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी कॅप्टन संतोष कांबळे, केअर टेकर डॉ. जे. व्ही. ठोंबरे, कॅप्टन आबासाहेब इंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले.