टार्डी अल्नार नुरोपथीवर डॉ.चव्हाण यांच्याकडून दक्षता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे शस्त्रक्रिया

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यासह मंगळवेढा, जत, पंढरपूर, आटपाडी या तालुक्यामध्ये नावारुपास असलेल्या दक्षता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये टार्डी अल्नार नुरोपथीवर डॉ.चव्हाण यांच्याकडून यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली.
वाढेगाव ता.सांगोला येथील संभाजी जाधव यांना टार्डी अल्नार नुरोपथी चा त्रास होता. म्हणजेच त्यांची नस कोपरमध्ये दबली गेली होती, त्यामुळे डाव्या हाताला मुंग्या येणे, हातातून वस्तु गळून पडणे, हाताची बोटे वाकडी होणे इत्यादी चा त्रास वर्षा पासुन होत होता.अचुक निदान केल्यानंतर लक्षात आले की हातातील नस कोपरा मध्ये दबली गेली आहे.
दीड तास चाललेल्या ऑपरेशन मध्ये डॉ.चव्हाण यांना नस मोकळी करण्यात यश आले. केवळ तीन आठवड्यामध्ये हातातून मुग्या येणे बंद झाले, हाताची वाकडी बोटे सरळ झाली आणि हातामध्ये पहिल्यासारखी ताकत आली. त्यामुळे जाधव हे पहिल्यासारखे काम करण्यास सक्षम झाले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे जाधव कुटुंबियांकडून हॉस्पिटलचे कौतुक होत आहे.