सेंट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली यांचे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळा उत्साहाच्या वातावरणात संपन्न.

सांगोला (उत्तम चौगुले) :-सेंट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली यांचे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सांगोला येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. मानव अधिकार म्हणजे काय ..तसेच मानव अधिकाराचे हनन होत असल्यास, शासकीय कार्यालयात पिळवणूक होत असल्यास ,अन्याय/अत्याचार, भांडण/तंटा होत असल्यास, कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास येथून पुढे सेंट्रल ह्यूमन राइट संघटन दिल्ली यांचे वरिष्ठ मार्फत न्याय मिळवून दिला जाईल असे ह्युमन राईट संघटन सांगोलाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतातून विचार मांडले. तसेच ह्यूमन राईट मानवाधिकार संघटन मध्ये ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांनी या संस्थेचे सदस्य व्हावे असेही अध्यक्षीय भाषणातून सर्वांना आव्हान करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटनासाठी नॅशनल सेंट्रल ह्युमन राइट संघटन दिल्ली चे श्री कुमार लोंढे साहेब तसेच महाराष्ट्र अध्यक्ष श्री दिनेश बिरवडकर साहेब हे आवर्जून उपस्थित होते उद्घाटनाच्या कार्यक्रमाबरोबर सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे सत्काराचा कार्यक्रम बचत भवन सांगोला येथे घेण्यात आला. सदर् कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल काळे सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष शांताबाई पवार सोलापूर शहर अध्यक्ष श्री बंटी पवार हे उपस्थित होते तसेच युवा उद्योजक श्री भैय्या बाबर श्री सचिन घोडके माळशिरस तालुका राष्ट्रवादीचे संजय मगर, माजी उपसरपंच शेंडगे ,माजी सैनिक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन रावसाहेब साळुंखे ,सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कोषाध्यक्ष उत्तम चौगुले उपस्थित होते .
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपुलकी प्रतिष्ठानचे रमेश अण्णा देशपांडे यांनी भूषविले .नवीन तालुका कार्यकारणी मध्ये अध्यक्ष बबनराव चंदनशिवे इंजिनीयर नरेश बाबर , जगन्नाथ काटे , रत्नदीप मागाडे ,गंगाधर इमडे गुरुजी, दिलीप उबाळे साहेब आणि भानुदास जगताप साहेब यांची निवड करण्यात आली अध्यक्षांच्या हस्ते निवडीचे पत्रही देण्यात आले आणि यथोचित सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी सुजान नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.