केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर

सांगोला – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे उद्या गुरुवार २४ रोजी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

 

 

या दौऱ्यात ना. रामदास आठवले यांच्या शुभहस्ते व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी सकाळी १०:३० वाजता सुमारे १ कोटी ५० रुपये निधीतून सांगोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रा. पी.सी झपके,शेकापक्षाचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख, तहसीलदार संजय खडतरे, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी , पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,गटविकास अधिकारी आनंद लोकरे, बांधकाम उप अभियंता अशोक मुलगीर, लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण , माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ ,ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी नगरसेवक संजय देशमुख, बसापाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.

 

तसेच गुरुवारी सकाळी ११ वाजता कोळे- तिप्पेहळ्ळी रोडवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार उद्घाटन व अस्थिकलेश प्रतिष्ठापना ना.रामदास आठवले यांच्या शुभहस्ते व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे या कार्यक्रमास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे , शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर गुरुवारी दुपारी १ वाजता चिकमहूद ता. सांगोला येथे ग्रामस्थांच्या वतीने व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button