आदर्श प्राथमिक विद्यालय सांगोला मधील दुर्गाप्रेरणा खटावकर ची नोंद ओमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

आदर्श प्राथमिक विद्यालय येथे इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत असलेली दुर्गाप्रेरणा खटावकरचे ओमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली दुर्गाप्रेरणा ही सर्व अक्षरे , म्हणी यांचे वाचन करते तिला हिंदी व मराठी भाषा अवगत आहे.
सध्या ती पहिलीच्या वर्गात जरी शिकत असली तरी तिने चौथीपर्यंत अभ्यास अवगत केला आहे.मोबाईलवर स्वतः ई लर्निंग करते .ती खूप हळवी आहे. एवढ्या लहान वयात एवढे आकलन शक्तीचा विचार करून तिचे ओमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद करण्यात आले आहे. तिला हा सन्मान महाभारत मधील सुप्रसिद्ध कलाकार सुरेंद्र पाल (द्रोणाचार्य ची भूमिका केलेले) व भारतातील कमी वयात पीएचडी केलेले डॉ. भूमिका गाला यांच्या शुभ हस्ते मुंबई येथे गौरवण्यात आले दुर्गाप्रेरणाला तिचे आई-वडील, आजी आजोबा यांचे मार्गदर्शन लाभले.
दुर्गाप्रेरणाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी , सचिव मा. श्री. लक्ष्मण गवळी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री दिपक वाघमोडे यांनी अभिनंदन केले.