जलसिंचन योजनेतून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजदर सवलत योजनेस ३१ मार्च २०२४  पर्यंत मुदतवाढ:- आमदार शहाजी बापू पाटील

सांगोला  ( प्रतिनिधी ) पावसाळी अधिवेशनात  सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याच्या योजना व माण कोरडा नद्यांवरील बंधारे टेंभू ,म्हैसाळ  योजनेतून भरुन देण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून सभागृहाचे लक्ष वेधले होते त्यावर महाराष्ट्र शासनाने आ. पाटील यांच्या लक्षवेधीची दखल घेऊन अतिउच्च दाब, उच्च दाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेतून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजदर सवलत योजनेस ३१ मार्च २०२४  पर्यंत मुदतवाढ दिली आहे व शासनामार्फत सुमारे ६७० कोटी इतके अनुदान महावितरण कंपनीस देण्यास मान्यता दिल्याचे माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान नीरा उजवा कालव्यातंर्गत सांगोला शाखा -५ चे आवर्तन सुरळीत पार पडणार आहे त्यानंतर शिरभावी संगेवाडी लाभ क्षेत्रात आवर्तन चालू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.सांगोला तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे खरीप हंगामातील पिके, फळबाग करपू लागल्या आहेत. जनावरांना पिण्याचे पाणी चारा, माणसांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या अनुषंगाने येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तालुक्यातील सिंचन योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी विषय लावून धरणार असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.
पावसाअभावी कोरडा दुष्काळी परिस्थिती पाहता येत्या ८  दिवसात टेंभु योजनेतून माण नदीवरील सर्व बंधारे व म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीवरील सर्व बंधारे ४०० क्युसेक्सने विसर्ग नदीत सोडून बंधारे भरून देण्याचा शब्द शासनाने दिला आहे .त्यासाठी सातत्याने पाठपुरावाही केला जाईल, म्हैसाळ योजनेतून हंगिरंगे ,पारे,डिकसळ आदी पूर्वेकडील लाभ क्षेत्रातील पिकांना पाणी मिळणार असून टेंभू योजनेतून बंदिस्त नलिका व कालव्यातून पिकांना पाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत. माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड, तानाजी पाटील आदी नेते मंडळाशी चर्चा विचार विनिमय करून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button