गावची सामाजिक सुरक्षा अबधीत ठेवण्यासाठी तंटामुक्त गाव करणे गरजेचे -भाई शंकर पाटील

गावची सामाजिक सुरक्षा अबधीत ठेवण्यासाठी समाजामध्ये तंटामुक्त मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महुद गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाई शंकर पाटील यांनी सांगितले..
भाई शंकर पाटील यांची नुकतीच महुद गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड ग्रामसभेच्या माध्यमातून करण्यात आली.निवड झाल्यानंतर गावातील वेगवेगळ्या समाजातील तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महुद गाव तंटामुक्त करण्याचा संकल्प केला आहे.पुढे बोलताना पाटील म्हणाले की..महुद गावांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुण्या गोविंदाने राहतात.कोणत्याही समाजाचा सामाजिक धार्मिक कार्यक्रम असेल तेंव्हा त्यामध्ये ईतर समाजातील लोक मनापासून सहभागी होतात.तसेच महुद गावांमध्ये अनेक राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होत असतात त्यामध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होत असतात.
तसे महुद गावचा नावलौकिक हा शांतताप्रिय गाव म्हणुन आहे तोच नावलौकिक पुढे चालु ठेवण्यासाठी सर्व नागरीकांचे सहकार्य घेणार असुन..विशेषता तरुणांना तंटामुक्तीचे महत्व पटवुन देण्यासाठी सांगोला पोलिस स्टेशन व महुद ग्रामपंचायतीच्या सहकार्याने एखादी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल..व तरुणांचे प्रबोधन केले जाईल.
गावांमध्ये काही किरकोळ मतभेद असतील किंवा रेंगाळलेले तंटे असतील ते सुध्दा संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.गावातील नागरिकांनीही कुठलीही घटना घडली तर अतताई पणाने कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नये एखादा वाद झाला तर समाजातील काही प्रतिष्ठित किंवा जाणते लोक असतील त्यांना सोबत घेऊन काही तंटे समाजा समाजामध्ये सोडवावेत गरज वाटल्यास तंटामुक्त समीतीला बोलवावे व आशा वादाचा तंटयाचा निपटारा करावा ..व मतभेद संपवावे..लगेचच कुठलाही टोकाचा निर्णय घेतला जाऊ नये..व आपले गाव तंटामुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागुन गावची सामाजिक सुरक्षा अबधीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत तंटामुक्त समितीचे नुतन अध्यक्ष भाई शंकर पाटील यांनी व्यक्त केल्याची माहिती चंद्रकांत सरतापे यांनी दिली